लोहा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड 3,82,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त.14 आरोपी विरोधात गुन्हे दाखल.

लोहा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड 3,82,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त.104 आरोपी विरोधात गुन्हे दाखल.


---------------------------------- 

लोहा प्रतिनिधी

अंबादास पवार 

---------------------------------- 

 एस पी अवीनाश कुमार साहेब यांच्या ऑपरेशन फ्लश आउट मोहिमे अंतर्गत सलग कारवाई.

 एसपी अविनाश कुमार साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे व गुन्हेगार यांना फलश आऊट करण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे.


 जुगार कायदा कलम 12 अ सोबत प्रथमच  भारतीय न्याय संहिता कलम 112 संघटित गुन्हेगारीचे कलम लावण्यात आले.


दि. 1/9/24 :- लोहा शहरामध्ये मोंढा मच्छी मार्केट भागामध्ये  8 जन बावन पत्त्याचा हार जितचा खेळ खेळत असल्याबाबत माहिती लोहा पोलिसांना मिळाली.


 सदर माहितीवरून  लोहा पोलिसांच्या टीमने  सदर ठिकाणी जाऊन रेड केला.

 यातील 8 आरोपींना पोलिसांनी पकडले 

 सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी डावावरून बावन पत्त्याचे  कॅट, रोख रक्कम, चार मोटारसायकली, 8 मोबाईल जप्त केले.

 पीएसआय रोडे साहेब यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे पोलीस स्टेशन लोहा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.


काल दि.31/8/24 रोजी लोहा पोलिसांनी ऑनलाईन जुगार गुडगुडी वर रेड करून 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


 गावाच्या बाहेर शेतामध्ये एका शेडमध्ये लॅपटॉप कीबोर्ड माऊस चार्ट याच्या साह्याने ऑनलाइन गुडगुडी चा खेळ खेळविला जात असल्याबाबत लोहा पोलिसांना माहिती मिळाल्या वरून लोहा पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारून 6 आरोपीन विरोधात गुन्हा दाखल केला शेतातील शेडमध्ये जुगार बसविण्यात आल्यामुळे शेडमालकाला पण आरोपी करण्यात आले आहे.यात 54 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पीएसआय रोडे साहेब व त्यांच्या टीमने केली.

 यावेळी पोनि चिंचोलकर साहेब यांनी जनतेला आव्हान केले आहे की आपणास कुठेही कोणत्याही प्रकारचे अवैध  धंदे चालू असल्याबाबत माहिती मिळाली असल्यास तात्काळ फोन करून किंवा व्हाट्सअप वर द्यावी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.