लोहा शहरात धोकादायक "उघड्या " डीपी बंदिस्त करा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नामदेव कटकमवार.
लोहा शहरात धोकादायक "उघड्या " डीपी बंदिस्त करा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नामदेव कटकमवार.
-----------------------------
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
-----------------------------
विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणाचा फटका अनेकदा जनतेला सहन करावा लागतो आहे.पावसाचे चार थेंब पडले की लाईट जाते .अशी परिस्थिती आहे त्यातच शहरातील विद्युत डीपी उघड्या असून त्या अंत्यत धोकादायक आहेत .त्यामुळे जीवतीत हानी होऊ शकते तेव्हा शहरातील उघड्या डीपी तात्काळ व्यवस्थित करण्यात अशी मागणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार यांनी केली आहे
वीज वितरण विभागाच्या कारभारा विषयी नागरिकांना नेहमीच फटका सहन करावा लागतो .शहरात केव्ह वीज पुरवठा जाईल यांचा नेम नाही.असा परिस्थितीत गल्लोगल्ली ज्या डीपी (रोहित्र) आहेत ते उघड्यावर आहेत .पूर्वी ते बॉक्स मध्ये बंद असत शिवाय त्याला किल्ली होती पण अलीकडच्या काळात या विभागावर कोणाचा वचक राहिला नाही .विशेषतः लोहा शहर व तालुक्यात ही अवस्था आहे
शहरातील श्रीराम नगर वलांडीकर याच्या भागात डीपी उघडी आहे तेथे वस्ती आहे .हे अत्यंत धोकादायक असूनही संबधित मात्र याकडे दुर्लक्ष करतात ही मोठी शोकांतिका आहे शिवाय वेली, झाडे सुडपे.यांनी या डीपी वेढलेल्या आहेत
शहरात जेथे जेथे असा उघड्या डीपी (रोहित्र) आहेत त्या सगळ्या बंदिस्त करण्यात .अशी मागणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवर यांनी केले आहे
Comments
Post a Comment