रौप्यमहोत्सही व्यापारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

 रौप्यमहोत्सही व्यापारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत..

-------------------------------

मुरगूड प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

-------------------------------

मुरगूड येथील रौप्यमहोत्सवी श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली .

प्रारंभी संस्थेचे सभासद रघुनाथ कांबळे भडगांव , आप्पासो खराडे शिंदेवाडी व उपस्थित मान्यवर सभासदांच्या हस्ते दिपप्रजलन करण्यात आले . तर अॅडव्होकेट सुधिर सावर्डेकर मुरगूड , पांडूरंग संकपाळ निढोरी , बाळासाहेब पाटील सावर्डे यानीं प्रतिमा पूजन केले .

यानंतर भारतातीत आणि महाराष्ट्रातील सहकार , शिक्षण , शहिद जवान , सांस्कृतीक , साहित्य ,नैसर्गिक उत्पात तसेच संस्थेचे मयत सभासद कै .आश्विनी संभाजी केसरकर , मालती वसंत आंबले,  शिवाजी गुंडू कांबळे , शामराव गोविंद तांबेकर ,  धनाजी भालकर, रघुनाथ विठ्ठल पाटील , प्रशांत आप्पासो करगावे , जयशिंग ज्ञानदेव पाटील , यानां श्रध्दांजली वाहण्यात आली .

यावेळी सभेत सुमेध सावर्डेकर,रिया पाटील , सुमित सावर्डैकर , प्रथमेश पाटील , अर्जुन एकल , आर्यन 

सणगर या१०वी१२वीच्या गुणवत्ताधारक पाल्यानां संचालकांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले .

यावेळी बोलतानां सभापती किरण गवाणकर म्हणाले रौप्यमहोत्सवी श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन२०२३-२४या आर्थिक वर्षात १८ कोटी ८९ लाख ठेवी व१६ लाख५७ हजार रु . इतका नफा मिळवून मुख्य शाखेसह मुदाळ तिट्टा येथिल शाखा कार्यरत राहून संस्थेने गरुड झेप घेतली आहे . आर्थिक नियोजनामुळे आणि काटकसरीच्या कारभारामुळे संस्था यशस्वीपणे वाटचाल करीत आहे . ते म्हणाले रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून सभासदानां भेटवस्तू देणार असल्याचे त्यानीं यावेळी सांगितले .

संचालक हाजी धोंडीराम मकानदार , संचालक किशोर पोतदार यानीं संस्था स्थापनेपासूनची यशस्वी प्रगतीची माहिती विषद केली .

कार्य लक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर यानीं अहवाल वाचन केले .नवनाथ डवरी , श्रीकांत खोपडे , सुनिल सोनार , राजू कुडवे , सुनिल कांबळे , महादेव साळोखे , आकाश रेंदाळे , चंदू कुंभार , सुधिर सावर्डैकर ,इ . सभासदानी चर्चेत सहभाग घेतला .आभार उपसभापती प्रकाश सणगर यानी मानले .

यावेळी संचालक सर्वश्री साताप्पा पाटील , शशिकांत दरेकर , नामदेवराव पाटील , प्रदिप वेसणेकर , प्रशांत शहा , निवास कदम , संदिप कांबळे , संचालिका रोहिणी तांबट , सुनंदा जाधव , कर्मचारी वर्ग , सभासद उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.