कमलापूर येथील समाज भवनाचे निष्कृष्ठ दर्जाचे काम आदिवासी ग्रामस्थांची चौकाशी ची मागणी.
कमलापूर येथील समाज भवनाचे निष्कृष्ठ दर्जाचे काम आदिवासी ग्रामस्थांची चौकाशी ची मागणी.
----------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.
मंगेश तिखट
----------------------------------
कोरपणा तालुक्यातील दुर्गम भाग कोलाम समाजाची वस्ती असलेल्या कमलापूर येथील दोन तीन वर्षांपूर्वी भूमिपुजन होऊन आज पर्यत अपूर्ण असलेल्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमा अंतर्गत समाज भवनाचे काम दोन वर्षा पासून कासव गतीने सुरु आहे . सदर कामात निष्कृष्ठ दर्जाची रेतीचा वापर करून बांधकाम निष्कृष्ठ दर्जाचे होत असल्याने .बांधकाम करीत असलेल्या मनमानी करीत असलेल्या ठेकेदाराच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहे . कमलापूर येथील समाज भवनाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात आहे मात्र बांधकामाची गुणवता निष्कृष्ठ असून सुध्द्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते या कामाकडे जानुनभुजुन कानाडोळा करीत असल्याचे आदिवासी ग्रामस्थाचे म्हणणे असून सदर कामाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकाशी करून तात्काल बांधकाम ठेकेदारावर कार्यवाही.करावी अशी मागणी कमलापूर येथील आदिवाशी कोलाम ग्रामस्थ प्रकाश येडमे,नामदेव चांदसूर्य,लक्ष्णम कोडापे,शंकर कोडापे,गणेश चांदसूर्य,पिसाराम सलाम,खंडेराव मडावी,सूर्यकांत कोडापे,कोतु हिरामन मडावी,प्रवीण कुमरे हिरामन अर्के यांनी केली आहे.
Comments
Post a Comment