अमरावती जिल्हा माहिती अधिकारी पदी श्री गजानन कोटुरवर रुजु.
अमरावती जिल्हा माहिती अधिकारी पदी श्री गजानन कोटुरवर रुजु.
-------------------------------------------
फ्रंट लाईव्ह न्यूज महाराष्ट्र
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
पी एन देशमुख.
-------------------------------------------
अमरावती.
जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती येथील जिल्हा माहिती अधिकारी या पदावर गजानन शेषराव कोटुरवार हे शुक्रवारी रुजू झाले आहेत. ही त्यांची प्रशासकीय बदली झाली असून त्यांनी माहिती अधिकारी अर्पणा यावलकर यांच्याकडून जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारला. माहिती अधिकारी अर्पणा यावलकर, माहिती सहाय्यक सतीश वाघमारे, वरिष्ठ लिपिक प्रतीक फुलारी, योगेश गावंडे, छायाचित्रकार सागर राणे, कनिष्ठ लिपिक गजानन परटके, कोमल भगत, वाहन चालक हर्षल हाडे, शिपाई राजश्री चौरपगार,, प्रतीक वानखडे या वेळीं उपस्थित होते. कोतुरवार यांनी यापूर्वी माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या मुंबई व जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ येथील उपसंपादक पदावर तसेच विभागीय माहिती कार्यालय, तसेच अमरावती येथे सहाय्यक संचालक तर जिल्हा माहिती कार्यालय बुलढाणा येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केलेले आहे. व त्यांना चांगला अनुभव आहे.
Comments
Post a Comment