अपघातातील अज्ञात इसमाचा उपचार दरम्यान मृत्यू.
अपघातातील अज्ञात इसमाचा उपचार दरम्यान मृत्यू.
-----------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------
गांधीनगर:- अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात इसमाचा सीपीआर रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही अपघाताची घटना 31 जुलैला सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास उचगाव ब्रिज जवळ घडली होती.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी अज्ञात इसम (वय 30, नाव पत्ता माहित नाही),पायी चालत उचगाव ब्रिज जवळून चालला होता. दरम्यान अज्ञात वाहनाने त्याला धडक देऊन वाहन चालकाने वाहन न थांबवता पलायन केले. त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रंगाने सावळा उंची साडेपाच फूट, छातीवर काळातीळ, काळे केस सरळ नाक, असे त्याचे वर्णन आहे. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असून नातेवाईकांनी गांधीनगर पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन पोलीस नाईक विठ्ठल पाटील यांनी केले आहे.
Comments
Post a Comment