कौलवच्या सुवर्ण महोत्सवी युनियन तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन कुंभार आणि उपाध्यक्षपदी शुभंम लोहार यांची निवड.

 कौलवच्या सुवर्ण महोत्सवी युनियन तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन कुंभार आणि उपाध्यक्षपदी शुभंम लोहार यांची निवड.

----------------------------------- 

कौलव प्रतिनिधी

संदीप कलिकते

----------------------------------- 

  कौलव ता राधानगरी येथील सुवर्ण महोत्सवी युनियन तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन कुंभार यांची निवड करण्यात आली.

   युनियन तरूण मंडळाची सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू असुन,मंडळाची स्थापना २६ जानेवारी १९७६ साली झाली असून मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जातो.मंडळाची गणेशमूर्ती आकर्षक स्वरूपात असते आजपर्यंत मंडळाने अनेक गरीब गरजू लोकांना आधार देण्याचे काम केले आहे छत्रपती.शिवाजी‌ महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्रदान संकल्पना,हालते देखावे, सामाजिक प्रबोधन देखावे, हळदी कुंकू समारंभ, गुणवंतांचा सत्कार असे अनेक सामाजिक उपक्रम कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना स्वकष्टाने व श्रमदानातून चालवलेले आहेत.

  चालु वर्षी सन २०२४/२५ सालाच्या गणेशोत्सव कार्यकारिणी निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी नितीन कुंभार, उपाध्यक्षपदी शुभंम लोहार आणि खजानिसपदी मानव लोहार यांची निवड करण्यात आली यावेळी निवडीवेळी किशोर पाटील,प्रतिक कवडे, महेश लोहार, धनाजी लोहार,अमृत लोहार, राहूल सोनाळकर, नागेश लोहार यांच्यासह मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.