जीवनात यश पुर्ण करण्यासाठी शिक्षण आवश्यक - डॉ.विजयकुमार पाटील.
जीवनात यश पुर्ण करण्यासाठी शिक्षण आवश्यक - डॉ.विजयकुमार पाटील.
-----------------------------------
कोल्हापूर -प्रतिनिधी
-----------------------------------
शिक्षण हे व्यक्तीला जीवनात स्वप्न पूर्ण
करण्यासाठी अत्यावश्यक असुन विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी खूप शिकावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ . विजयकुमार पाटील यांनी केले .
श्रीपतराव चौगुले आर्टस ॲण्ड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली ता .पन्हाळा येथे ज्युनिअर सायन्स विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी बोलत होते .प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील होते . प्राचार्य डॉ .विजयकुमार पाटील अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना म्हणाले , ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ ही दर्जेदार शिक्षण देणारी संस्था असून त्यामध्ये कष्टकरी कामगार, शेतमजूर, शेतकरी यांच्या मुले मुलीनी शिक्षण घेवून सर्वच शैक्षणिक क्षेत्रात अव्वल स्थान निर्माण केले आहे . अशा संस्थेत शिकणारे विद्यार्थी भाग्यवान ठरले आहेत. ग्रामिण भागातील विद्यार्थी शिकला पाहीजे यासाठी सर्व सोयी सुविधा देण्यासाठी संस्था अविरत धडपडत आहे . यांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे . विद्यार्थ्यांनी संशोधनात प्रगती करून परदेशात जाण्याची संधी प्राप्त करून घ्यावी . विद्यार्थ्याच्या मागणीची पुर्तता करण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले . ज्युनिअर विभाग प्रमुख सिनेट सदस्या डॉ.उषा पवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले . या वेळी आयक्युसी समन्वयक डॉ . बी .एन .रावण , ॲक्टीव्हीटी प्रमुख डॉ .एस .एस . कुरलीकर सांस्कृतिक विभाग प्रमुख ए. आर . महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती . नवागत विद्यार्थ्यांचे ज्ञानामृत पुस्तक वही गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली . कार्यक्रमास ज्युनिअर सायन्स विभागाचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर सायन्स विभागाचे समन्वयक पी.बी.लव्हटे यांनी केले.सुत्रसंचालन मयुरी भोसले ,अमृता जाधव तर आभार तृप्ती वांद्रे या विद्यार्थीनींनी मानले .
फोटो कॅप्सन : श्रीपतराव चौगुले आर्ट स ॲण्ड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली येथे नवागत विद्यार्थांचे स्वागत करताना संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील सोबत डॉ .उषा पवार ,प्राचार्य डॉ .विजयकुमार पाटील , डॉ.बी .एन .रावण ,डॉ .एस . एस .कुरलीकर .
Comments
Post a Comment