हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागातील गौण खनिज चोरी प्रकरणात महसूल, पोलिस अन् आरटीओचे पथक ठरतेय कुचकामी.
हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागातील गौण खनिज चोरी प्रकरणात महसूल, पोलिस अन् आरटीओचे पथक ठरतेय कुचकामी.
-------------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
-------------------------------------
गौण खनिज चोरी रोखण्यासाठी स्थानिकांची मदत अन् खासगी सुरक्षा रक्षकही नेमणार असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काही दिवसापूर्वी काढला असल्याचे समजते ,परंतु सदर आदेशाला केराची टोपली दाखवत गौण खनिजाचे ठेकेदार सध्या मालक झाले असून. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज, नेज , शिवपुरी व बाबुजमाल डोंगर परिसरातील गौण खनिजाची चोरी रोखण्यात गौण खनिज विभागासह पूर्ण महसूल विभाग अपयशी ठरत आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेली महसूल, पोलिस व आरटीओ कर्मचारी असलेले विशेष पथकही कुचकामी ठरले. आता गौण खनिज चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक शेतकरी, संबंधित परिसरातील इतर व्यावसायिकांची मदत घेणे गरजेचे आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले बाबुजमाल व नेजची खिंड गौण खणिज तस्कर पुसून टाकण्याचे काम करत आहेत. परिणामी गौण खनिज उत्खनन व तिथे सुरू असणाऱ्या खडी क्रेशर मळे परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असून सदर प्रदूषणामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. गौण खनिज उत्खननात काही लोकप्रतिनिधींचाही वाटा असल्याचे चर्चा ग्रामस्थातून सध्या जोर धरत आहे. पण मी हातकणंगलेच्या तहसीलदारांची सध्या बदली झाली असून त्या ठिकाणी दुसरी तहसीलदार रुजू झाले आहेत परंतु नवीन तहसीलदारांना सदर ठिकाणची माहिती मिळेपर्यंत गौण खनिजाचे ठेकेदार व त्यांना सामील असणारे महसूल अधिकारी मालामाल होणार असल्याचे चर्चा बोलली जात आहे.
परिणामी गौण खनिज उत्खनन केलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे व खाणी निर्माण झाले असून सदर खानी व खड्डे भावी आयुष्यात ग्रामीण भागातील नागरिकांना धोक्याचे ठरणार आहेत.त्यामुळे गावाभोवती असलेली डोंगरसंस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महसूल, पोलिस आणि परिवहन खात्याचा ताळमेळ नसल्याने आळा बसेना. नेज, बाबुजमाल परिसरातील डोंगर व गावरान जमिनीची अवस्था सध्या बिकट बनली आहे. यानंतर गौण खनिज तस्करांवर कठोर कारवाई कोण करणार याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.
बाबुजमाल व नेज ,शिवपुरी,कुंभोज भागातील सरकारी गावरान व डोंगरावरून दगड,व मुरमाची तस्करी होते. महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच ही चोरी सुरू असल्याचे काही तस्करांनीच सांगितले.
पर्यावरण, वन्यजीवांना धोका
डोंगरसंस्कृती घटल्याने पर्यावरण आणि वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. महामार्गासाठी अनेक टेकड्या, डोंगररांगा नष्ट केल्या, डोंगर नष्ट झाल्याने गावातील पर्जन्यमान, वातावरण, सुरक्षितता धोक्यात आली आहे. झाडेझुडपे नष्ट झाल्याने येणाऱ्या काळात गावचे तापमान वाढणार असून उत्खननाच्या धुळीमुळे ऑक्सिजन व ओझोनचा थर कमी होत आहे.
विनानंबर वाहनांचा होतो वापर
खनिकर्म विभागामार्फत अनधिकृत गौण खणिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी आतापर्यंत केलेल्या कारवायांमध्ये पकडण्यात आलेल्या वाहनांपैकी अनेक वाहने ही विनाक्रमांकांची आहेत. नेज,कुंभोज बाबुजमाल डोंगरांमधून काढण्यात आलेला दगड तसेच त्यानंतर क्रशरच्या माध्यमातून तयार केलेल्या खडीच्या वाहतुकीसाठी विनाक्रमांक वाहनांचा वापर केला जातो. तसेच काही गौण खनिज उत्खनन करणारे ठेकेदार रॉयल्टी पेक्षा जास्त प्रमाणात मुरमाचे उत्खनन करून वाहतूक करत असून त्याकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सध्या नेज व बाबुजमल डोंगर परिसरातील मुरूम हा सांगली जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी पाठवला जात असल्याचे चित्र दिसत असून, गौण खनिज विक्री करणारे ठेकेदार जितकी रॉयल्टी भरली आहे ,तितकाच मुरूम काढतात का याकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून त्याला सर्वच शासकीय यंत्रणेची मदत लाभत आहे. परिणामी दिवसभर होणारी डंपर ने मुरम व दगडाची वाहतूक यामुळे शाळा व शेती परिसरातील नागरिकांना नाहक त्रास होत असून वाहतूक करत असताना रस्त्यावरती पडणाऱ्या मुरमामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी अनेक गौण खनिज उत्खनन करणारे ठेकेदारांनी बऱ्याच ठिकाणी जमिनी खरेदी केल्या असून त्या जमिनीतून मुरूम काढून अन्य जिल्ह्यामध्ये त्याची विक्री केली जात असल्याचे चित्र दिसत आहे.
Comments
Post a Comment