कुडाळमधील दारू विक्रेत्यांवर मेढा पोलिसांची धडक कारवाई मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद.

 कुडाळमधील दारू विक्रेत्यांवर मेढा पोलिसांची धडक कारवाई मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद.

---------------------------------

 मेढा  प्रतिनिधि 

शेखर जाधव

-----------------------------------

 मेढा : जावली तालुक्यातील कुडाळ गावामध्ये दोन दारू विक्रेत्यांवर मेढा पोलिसांनी धडक कारवाई करून गुन्हा नोंद केला आहे.महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) 83 प्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आरोपी युवराज कांबळे वय 47 वर्ष रा.इंदिरानगर कुडाळ ता.जावली.जिल्हा सातारा व निलेश पवार रा.कुडाळ ता.जावली जिल्हा सातारा या दोघांच्या विरुद्ध मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दि.12 ऑगस्ट रोजी 19.40 वा.चे सुमारास मौजे कुडाळ ता.जावली गावचे हद्दीमधील लाचुंड्याच्या ओढ्याच्या कडेला चिंचेच्या झाडाखाली हा अवैद्य दारू धंदा सुरू होता.या अवैद्य धंद्यावर मेढा पोलिसांनी जाऊन धडक कारवाई केली आहे.या कारवाईमध्ये पोलिसांकडून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईमुळे जावली तालुक्यातील अवैद्य धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत तसेच मेढा पोलिसांनी केलेल्या कारवाई बाबत तालुक्यातील सर्व स्तरावरून मेढा पोलीस अधिकाऱ्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.या घटनेचा पुढील तपास अंमलदार P.N शेख करत आहेत. तसेच जावली तालुक्यातील अवैध धंद्यांनवर मेढा पोलिसांनी धडक कारवाई सुरूच ठेवावी अशी मागणी जावलीतील नागरिक व माता-भगिनी करू लागल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.