अकिवाट दुर्घटनेतील माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह सापडला.
अकिवाट दुर्घटनेतील माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह सापडला.
----------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
----------------------------------
अकिवाट येथे शुक्रवारी बस्तवाड अक्किवाट मार्गावर पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून एकाचा मृत्यू व चार जण सुखरूप तसेच दोघे बेपत्ता झाले होते यातील बेपत्ता झालेल्या माजी सरपंच अण्णासाहेब हासुरे यांचा मृतदेह आज शनिवारी साडे अकराच्या दरम्यान एन डी आर एफ जवानांना मिळून आला मात्र अध्याप बेपत्ता झालेले माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल वैरागदार यांचा शोध सुरू
आहे
अकिवाट दुर्घटनेतील बेपत्ता दोन व्यक्तींचा शोध वजीर रेस्क्यू फोर्स एनडीआरएफ इंडियन रेड क्रॉस सोसायटी आपत्ती व्यवस्थापन व्हाईट आर्मी यांच्यामार्फत सात यांत्रिक बोटीद्वारे शोध सुरू होता शुक्रवारी सायंकाळी उशिरा ही मोहीम थांबवण्यात आली यानंतर पुन्हा शनिवारी सकाळी पुन्हा ही शोध मोहीम सुरू केली असता विस्तीर्ण असलेल्या बस्तवाड अकिवाट मार्गावरील कृष्णा नदी पात्रात हासुरे यांचा मृतदेह मिळून आला यांत्रिक बोटीच्या सहाय्याने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी तो पाठवण्यात आला आहे
फोटो
1) अण्णासाहेब हसुरे
2) अण्णासाहेब हासुरे यांचा मृतदेह
Comments
Post a Comment