सौ.जमुना लालचंदजी ओसवाल यांच्याकडून सावित्रीबाई फुले रुग्णालयास पत्र्याचे शेड.

 सौ.जमुना लालचंदजी ओसवाल यांच्याकडून सावित्रीबाई फुले रुग्णालयास पत्र्याचे शेड.


------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कु.श्रृती सचिन कुंभार 

------------------------------------

कोल्हापूर ता.06 : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज यांच्या सौजन्याने सी. एस. आर. मधून नरेंद्र ओसवाल व सुखराज ओसवाल यांनी रुग्णांच्या व नातेवाईकांच्या सोईस्तव पत्र्याच्या शेडची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. ओसवाल यांनी आपल्या मातोश्री सौ.जमुना लालचंदजी ओसवाल यांच्या नावाने सुमारे २ लाख ५० हजार रुपये खर्च करून ही सुविधा उपलब्ध करून दिली.  या सुविधेचा नुकताच लोकार्पण सोहळा सौ.जमुना लालचंदजी ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहा.आयुक्त संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.संजना बागडी, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजचे अध्यक्ष प्रसाद मंत्री, सेक्रेटरी आरती अगरवाल, असिस्टंट गव्हर्नर गिरीश जोशी, पदाधिकारी सुखराज ओसवाल, दिनेश दुल्हाणी, आमिष शहा, अनुप शहा, कुमार परमार, डॉ.अतुल मेहता, हर्षवर्धन पाटील, धनंजय थोरात, राहुल कत्रुट, जयेश गांधी, पूजा गांधी, श्रुती मंत्री, डॉ.अभिजीत वज्रमुष्टी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.