गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.

 गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.

------------------------------ 

कुंभोज: प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

   येथील शिवाजीनगर मधील अष्टविनायक तरुण मंडळाचे कार्यकर्ते गणेशाच्या आगमन सोहळ्याचा डिजिटल फलक लावताना  विद्युत प्रवाह असणाऱ्या तारेला  फलकाच्या लोखंडी फ्रेमचा स्पर्श झाल्यानें  

विजेचा शाॅक लागून अरूण रमेश वडर (वय-२२) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. यातील तिन जणांवर कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात तर एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अरूण वडर याच्या मृत्यूने संपूर्ण गारगोटी नगरीवर शोककळा पसरली आहे. 

       शुक्रवारी रात्री दहाच्या वाजण्याच्या सुमारास शिवाजी नगर गारगोटी येथील अष्टविनायक तरुण मंडळाच्या कार्यकर्ते  फलक लावत होते.  यावेळी फलक लावलेल्या बांबूला शिडी लावली होती. फलक बांधून एक जण खाली उतरत असताना फलकाचा बांबू कोलमडून फलक तारेवर पडला. विद्युत प्रवाह फलकाच्या लोखंडी फ्रेम मधून लोखंडी शिडीत उतरला. शिडी धरलेला अरूण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. फलकाला धरलेले सहा जणांना शाॅक लागून बाहेर फेकले गेले.  अविनाश भोपळे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. खाजगी रुग्णालय त्वरित उपचार झाल्याने भोपळे यांचा जीव वाचला. तर यश तानाजी शालबिद्रे, अविनाश कृष्णा भोपळे, अमोल विलास सुतार, श्रीधर वडर याच्यावर कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर किरकोळ जखमी  तरुणांच्यावर गारगोटी रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. जखमींना त्वरित उपचार मिळावेत  यासाठी जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबीटकर, बाजार समितीचे संचालक शेखर देसाई, सरपंच प्रकाश वास्कर, ग्रा. प. सदस्य भरत शेटके यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी गारगोटी रूग्णालयात दाखल केले.

     मृत अरूण  इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्यावर काळाने झडप घातल्याने वडर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.