जिल्हा मध्यवर्ती बँक चिखली येथे आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण.

 जिल्हा मध्यवर्ती बँक चिखली येथे आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण.

---------------------------------- 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत सिंह ठाकुर 

---------------------------------- 

वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज बनली आहे.बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणली आहे. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगन भरारी घेतली, प्रगती साध्य केली, परंतु आपल्या कृतीमुळे पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले. मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल झाल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग पावसाची अनिश्चितता असे प्रश्न जगाला भेडसावत आहेत शुद्ध हवा पाणी व ऑक्सिजन हवा असेल तर झाडाशिवाय पर्याय नाही या उदात्त भावनेतून अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्या हस्ते दि. 1 ऑगस्ट रोजी दि.अकोला- वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चिखली च्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. चिखली ह्या त्यांच्या मूळ गावी बँकेच्या परिसरात धान्य साठवण गोदाम असून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हजारो क्विंटल मालाची साठवणूक केली जाते. तेथे शेतकऱ्यांना सावलीसाठी वृक्ष लागवड करण्यात आली व गावातील नागरिकांना वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. वृक्षारोपण कार्यक्रमास प्रा.अनिल मडके, प्रवीण खडसे, माणिकराव देशमुख, अशोक वाकळे बँकेचे कर्मचारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.