कळे केंद्रांतर्गत पहिली शिक्षण परिषद विद्या मंदिर मरळी या शाळेत संपन्न .
कळे केंद्रांतर्गत पहिली शिक्षण परिषद विद्या मंदिर मरळी या शाळेत संपन्न .
----------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
----------------------------
सन २०२४ -२०२५या शैक्षणिक वर्षातील पहिली शैक्षणिक परिषद विद्यामंदिर मरळी या शाळेत उत्साहात संपन्न झाली .शिक्षण परिषदेचे उद्घाटन गावच्या सरपंच मा .सौ .विमल चौगुले व उपसरपंच श्री .वसंत पवार यांच्या उपस्थित पार पडले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ .संगीता अस्वले मॅडम यांनी केले .गावातील पालकांचे शाळेसाठी योगदान खूप मोठे आहे हे सांगताना दरवर्षी एक लाख शैक्षणिक उठाव या गावातून शाळेला होतो असे प्रास्ताविकात सौ .अस्वले मॅडम यांनी व्यक्त केले .शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन शाळेच्या अध्यापिका सौ .दिंडे मॅडम उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे अध्यापक श्री तानाजी निर्मले सर व कोकणी मॅडम यांनी केले .या शिक्षण परिषदेसाठी कळी केंद्रांतर्गत सर्व शाळेचे अध्यापक उपस्थित होते .सर्व शिक्षकांना कळे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विजय फासे व श्री सागर हंबर सर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले .मुख्यमंत्री माझी शाळा अभियान,दप्तर मुक्त आनंददायी शनिवार,पायाभूत चाचणी गुण नोंद,शासकीय परिपत्रके याविषयी सखोल मार्गदर्शन केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विजय फासे यांनी केले.आभार मरळी शाळेचे विषय शिक्षक श्री सुभाष कुंभार यांनी मानले.
Comments
Post a Comment