सभासदांच्या पाठबळावरच दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणीची प्रगती : डॉ अशोकराव माने.
सभासदांच्या पाठबळावरच दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणीची प्रगती : डॉ अशोकराव माने.
---------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------------
अशोकराव माने यांना आमदार करणारच मा.जि. प. सदस अरुण इंगवले, प्रसाद खोबरे यांची ग्वाही
तमदलगे: प्रतिनिधी : सभासदांनी टाकलेला विश्वास आणि दिलेल्या पाठबळाच्या जोरावरच गेल्या 32 वर्षात देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीने प्रगतीची गरुडभरारी घेतली आहे येत्या काही दिवसातच a आणखी 8 हजार चात्या बसवून पूर्ण क्षमतेने सूतगिरणी चालवली जाईल असा विश्वास सूतगिरणीचे संस्थापक चेअरमन दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केला आहे दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले आणि प्रसाद खोबरे यांनी डॉ अशोकराव माने यांचे कार्य आदर्शवत असून त्यांना जनतेचा पाठिंबा उत्स्फूर्तपणे मिळत असल्याने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही दिली
तमदलगे येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगणीच्या कार्यस्थळावर सूतगिरणीची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना हात उंचावून एकमताने मंजुरी दिली यावेळी डॉ. माने हे सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते
सुरुवातीस उपस्थित मान्यवर व संचालक मंडळाच्या हस्ते देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून वार्षिक सभेची सुरुवात करण्यात आली सूतगिरणीचे जनरल मॅनेजर जी.आर. माने यांनी अहवाल सालातील दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा तसेच ऑलिंपिक स्पर्धेत देशातील खेळाडूंनी मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल त्या सर्व खेळाडूंच्या अभिनंदनचा ठराव मांडला
स्वागत व प्रस्ताविक सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन अनिलराव कांबळे माणगांवकर बोलताना म्हणाले की वस्त्रोद्योगात मंदीचा काळ आहे त्याचबरोबर कापड व्यवसायही अडचणीतून सुरू आहे अशा आव्हानात्मक काळात दलित मित्र डॉ.अशोकराव माने यांनी संस्थेची प्रगती साधली आहे अनेक सहकारी सूतगिरण्या बंद पडत असताना ही सूतगिरणी सक्षमपणे सुरू आहे त्याचबरोबर कोरोना महापूर यासह अनेक नैसर्गिक आपत्तीत संस्थेचे कामगार व कुटुंबीयांना जगविण्याचा प्रयत्न करण्यात आला सभासदांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून सूतगिरणीचे काम सुरू आहे सहकारी सूतगिरण्या टिकवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन दिलासा देण्याची गरज आहे
सूतगिरणीचे प्रभारी कार्यलक्षी संचालक संजय बिडकर यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले उपस्थित सभासदांनी टाळ्याच्या गजरात व हात उंचावून सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी दिली
यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन दलितमित्र डॉ. अशोकराव माने बोलताना म्हणाले सहकारी तत्त्वावर सूतगिरण्या चालविणे हे मोठे संकट निर्माण झाले तरीही आपल्या सूतगिरणीने या व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला सूतगिरणीत 22 हजार चात्या बसविण्यात आल्या आहेत आणखी 8 हजार चात्या सूतगिरणीत बसविण्यात येणार आहेत भविष्यात सूतगिरणीच्या नफ्यातील वाटा सभासदांना देण्याचा प्रयत्न करू मी करत असलेल्या जनसेवेच्या कामाची दखल हातकणंगले विधानसभा मतदार संघातील जनतेने घेतली आहे यामुळे जनतेच्या पाठबळावर आमदार होण्यासाठी हा मतदारसंघ पिजून काढला आहे नेत्यांच्या आशीर्वाद आणि तुमची साथ यावर निश्चितच आपण या निवडणुकीत यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुणराव इंगवले बोलताना म्हणाले की अनेक संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा हा केवळ फार्स ठरत आहे अनेक संस्थेच्या सभेत गोंधळच होतो पण या सूतगिरणीच्या सभेत सर्व सभासदांनी हात उंचावून सर्व विषयांना काय एकमताने मंजुरी देऊन डॉ अशोकराव माने यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला ही बाब अभिमानास्पद आहे डॉ माने यांनी सर्व सहकारी संस्था आदर्शवत चालवल्या आहेत त्यांचे सहकार सामाजिक राजकीय यासह विविध क्षेत्रातील लोकोपयोगी कार्य जनतेच्या मनात घर करून बसले आहे यामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून जाऊन मंत्री होतील याचा आम्हाला विश्वास आहे त्यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ आम्ही आता
बसणार नाही अशी ग्वाही इंगवले यांनी दिली.
माजी जि. प. सदस्य प्रसाद खोबरे बोलताना म्हणाले की अडचणीच्या काळातही डॉ अशोकराव माने यांनी सभासद कामगार बंधूंचे हित जोपासत सहकारी संस्था आदर्शवत चालवून प्रगती साधली आहे त्यांचे समाजाभिमुख काम जनतेच्या मनात रुजले असल्याने त्यांना मोठे पाठबळ मिळत आहे हातकणंगले तालुक्यातील जनतेच्या मनातील आमदार म्हणून बापूंची ओळख झाली आहे यामुळे त्यांना आमदार करण्याकरिता सर्व सभासद संचालक मंडळांने विधानसभेच्या निवडणुकीत जीवाचे रान करावे आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत आहे या वर्षी बापूंना नक्कीच आमदार करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली
संचालक जितेंद्र चोकाककर यांनी आभार मानले पसायदान घेऊन सभेची सांगता झाली या सभेस सूतगिरणीचे संचालक डॉ अरविंद माने सौ रेखादेवी माने इंदुमती माने सदाशिव उर्फ बबन बन्ने बापूसो मिसाळ विलास माने चिंतामणी निर्मळे नानासाहेब राजमाने अमरसिंह धुमाळ वसंत कांबळे सूतगिरणीचे चीफ अकाउंटंट विवेक कुलकर्णी सतीश राजमाने यांच्यासह सर्व संचालक सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment