नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत किसन वीर महाविद्यालयात नशा मुक्ती शपथ.

 'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत किसन वीर महाविद्यालयात नशा मुक्ती शपथ.

-----------------------------------------------

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

--------------------------------------- 

वाई, दि. १२: 'नशा मुक्त भारत अभियान' या अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने भारत  सरकार, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आदेशान्वये किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ०९:०० वाजता किसन वीर महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना नशा मुक्तीची शपथ देण्यात आली. 

या प्रसंगी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, यांची उपस्थिती होती.  

विद्यार्थ्यांनी स्वतः नशेपासून दूर राहून, आपला मित्र-परिवार, नातेवायिक, शेजारी-पाजारी यांनाही  नशेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे व आपल्या देशाला सक्षम व बळकट करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. अशी भूमिका कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी मांडून, नशा मुक्ती शपथेचे वाचन केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले.

  नशा मुक्ती शपथ घेण्यासाठी एन. एस. एस. चे स्वयंसेवक, महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.