कंत्राटदार व अधिकारी मिळून कोट्यावधीचा भ्रष्टाचार, सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वीज केंद्राला पुरवठा करणाऱ्या त्या कंत्राटदाराचे बिंग फुटणार?
कंत्राटदार व अधिकारी मिळून कोट्यावधीचा भ्रष्टाचार, सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वीज केंद्राला पुरवठा करणाऱ्या त्या कंत्राटदाराचे बिंग फुटणार?
---------------------------------
चंद्रपूर प्रतिनिधी
मंगेश तिखट
----------------------------------
चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर तर्फे चंद्रपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वीज केंद्राला पुरवठा करण्याचा करार झाला. त्यानुसार मागील नोव्हेंबर 23 पासून प्रक्रिया केलेले सांड पाणी शहरातील दोन केंद्रावरून वीज केंद्राला पुरवठा केले जात असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र करारानुसार दरमहा 50 MLD (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी वीज केंद्र उचलणार आहे ते पाणी खरंच सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज केंद्राला पाठविण्यात येते का? यांची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे असून याचे कंत्राट घेणाऱ्या त्या ठेकेदाराला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राकडून सहकार्य मिळत असल्याने या कंपनीला कोट्यावधीचा आगाऊचा विनाकारण भुर्दंड बसत असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान चंद्रपूर शहर महानगरपालिका तर्फे दोन्ही सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज केंद्राला रोज किती पाणी देण्याचा करार आहे याबद्दल साशंका असली तरी वीज केंद्राला जेवढे पाणी रोज हवे, तेवढे पाणी देण्यास शहरातील दोन प्रक्रिया केंद्रे सक्षम आहेत काय? याचा विचार करण्याची गरज आहे. कारण करारानुसार जर रोज 50 MLD पाणी चीज केंद्राला हवे असेल, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरात सांडपाणी गोळा होते का? हा मोठा प्रश्न असून याचे प्रत्यक्ष आकलन कोणी केले याबद्दल सुद्धा संशय व्यक्त होत असून हा करार म्हणजे धन उगाई चा अड्डा तर बनत नाही ना? अशी शंका येत आहे. कारण अगोदरच वीज दर मोठ्या प्रमाणात सरकारने वाढवले असल्याने जनता त्रस्त आहे त्यातच वीज निर्मिती केंद्राद्वारे फालतूचा खर्च जर होत असेल तर त्यावर पायबंद घातला गेला पाहिजे हे सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे.
सीएसटीपीएस व महानगरपालिका प्रशासन गप्प ठेकेदार मालामाल?
खरं तर चंद्रपूर शहरात सांडपाणी गोळा करण्यासाठी भूमिगत गटार पाइपलाइनची कनेक्टिव्हिटी पूर्ण नसतानाही सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना पाणी कसे पुरवठा केले जात आहे? सांडपाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमधील पंपांची क्षमता कमी असतांना या करारानुसार दरमहा 50 MLD (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी चीज केंद्र उचलणार, पण प्रत्यक्षात हा आकडा सरासरी 35 ते 40 दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढा असायला हवा पण तो तेवढा जात नाही, शिवाय चंद्रपूर शहराला पिण्यासाठी इराई धरणावरून 41 MLD पाणी रोज दिले जाते. मग त्यापेक्षा अधिक सांडपाण्याचा करार कसा करण्यात आला? याचे उत्तर मिळत नाही, आश्चर्यांची बाब म्हणजे उन्हाळ्यात सरासरी 35 MLD पाणी उचलण्यात आल्याची अधिकृत नोंद आहे. पण हे पाणी कुठून आणले याचे कोडे सुटत नाही, दरम्यान सीएसटीपीएस मधील सेवानिवृत्त कंत्राटदाराला दरमहा तीन ते साडेतीन कोटीचे बिल अदा केले जात आहे तो कंपनीला भुर्दंड आहे आणि इथे मोठा भ्रष्टाचार सुरु आहे, खरं तर नदीतून पाणी उचलत असेल तर पाटबंधारे विभागाची परवानगी व या संपूर्ण प्रक्रियेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर संबंधित संस्थांची भूमिका महत्वाची असतांना त्याबद्दल चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र व महानगरपालिका प्रशासन यांनी त्याबाबत करार करतांना परवानगी घेतलीय का यांची स्पष्टता नाही त्यामुळं एकूणच सीएसटीपीएस व महानगरपालिका प्रशासन गप्प राहून ठेकेदार मात्र मालामाल होतांना दिसत आहे, या संदर्भात लवकरच कुणाकुणाची भागीदारी आहे ते उघड होणार आहे
Comments
Post a Comment