विद्या मंदिर बावेली शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सलिम म्हालदार यांची निवड.

 विद्या मंदिर बावेली शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सलिम म्हालदार यांची निवड.

------------------------------------- 

कौलव प्रतिनिधी

संदीप कलिकते

------------------------------------- 

विद्यामंदिर बावेली ता गगनबावडा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सलिम म्हालदार यांची निवड करण्यात आली.     

       चालु शैक्षणिक वर्षाची पालक सभा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरपंच युवराज कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केली होती या सभेतुन नवीन शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली यामध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  श्री.सलीम म्हालदार व सौ.दिपाली गिरीश म्हस्कर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करणेत आली.सचिवपदी मुख्याध्यापक शिवाजी जांबळे तसेच सदस्य पदी श्री.कैलास पाटील, सागर सावंत,आसिफ मुल्लाणी गारीवडे,सुनील कदम सुतारवाडी, कृष्णात जिनगरे कडवे,शोभा  हरुगले, गीता कांबळे,सुनीता  काटे , शिक्षण तज्ञ नितेश गुरव, ग्रामपंचायत प्रतिनिधी सदस्य भारती हारूगले यांची निवड करणेत आली. यावेळी निवड झालेल्या सर्व नुतन शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी नुतन अध्यक्ष सलिम म्हालदार यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वांनी आदर्शवत काम करूया असे सांगितले या निवडी प्रसंगी मुख्याध्यापक  शिवाजी जांभळे सर.अध्यापक तुकाराम.चौगले सर, सरपंच युवराज कदम आण्णा,माजी अध्यक्ष .विजय पाटील यांच्यासह विद्यार्थी,पालक उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी जांबळे यांनी आणि आभार तुकाराम चौगले सर यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.