हुंदळेवाडीत घर कोसळून लाखोंचे नुकसान; सुदैवाने अनर्थ टळला.
हुंदळेवाडीत घर कोसळून लाखोंचे नुकसान; सुदैवाने अनर्थ टळला.
---------------------------------
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
'पुष्य' (म्हातारा) नक्षत्रात पावसाचा जोर वाढला आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. सोमवारी (दि. २९ रोजी) हुंदळेवाडी येथे वैजनाथ यल्लाप्पा बेळगावकर, भैरुनाथ दत्तू बेळगावकर व कृष्णा पांडुरंग बेळगावकर या तिघांचे घर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळले. त्यात त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
- अनर्थ टळला
घर कोसळण्याच्या पाच मिनिटं अगोदर पार्वती बेळगावकर या आज्जी जेवण करून बाहेर आल्या होत्या. तेवढ्यात पाठीमागच्या बाजूनं घर कोसळेल. सुदैवाने अनर्थ टळला. घरांच्या भिंती कोसळून जनावरांच्या गोठ्यावर पडल्यामुळे ढिगाऱ्याखाली जनावरे सापडली होती. पण, शेजाऱ्यांनी लागलीच मदतीला जाऊन जनावरांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. या दुर्घटनेत जनावरांना मुका मार व खरचटले आहे. गावचे पोलीस पाटील व तलाठी यांनी लागलीच पंचनामा केला.
Comments
Post a Comment