▪️कंधार शहरातील हातावर पोट असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना हक्काची जागा मिळणार-आमदार श्यामसुंदर शिंदे.
▪️कंधार शहरातील हातावर पोट असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना हक्काची जागा मिळणार-आमदार श्यामसुंदर शिंदे.
--------------------------------
लोहा प्रतिनिधी
अंबादास पवार
--------------------------------
▪️कंधार येथे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व वन विभागाची आढावा बैठक संपन्न.
कंधार शहरातील श्री. संत नामदेव महाराज मंगल कार्यालयामध्ये लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल पंधरवाड्यानिमित्त महसूल व वन विभागाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, यावेळी कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे,लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार रेखा चामनर, गणेश मोहिजे कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, कंधार तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष बाबुराव किडे, हरबळ चे सरपंच अवधूत पाटील शिंदे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, समन्वय समिती सदस्य बालाजी ईसातकर, राम पाटील गोरे ,सिद्धू पाटील वडजे, शेख शेरू भाई,नवनाथ बनसोडे, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य अवधूत पेटकर, महेश पिनाटे प्रमुख उपस्थित होते, यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की,कंधार शहरातील भवानीनगर कमानीपासून ती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत नगर परिषदेच्या जागेवर शहरातील हातावर पोट असलेल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणावर काही दिवसापूर्वी नगर परिषदेने हे अतिक्रमण उठविले होते यामुळे शहरातील अनेक छोटे मोठे व्यापाऱ्यावर उपासमारीचे संकट उडवले होते या पार्श्वभूमीवर मी या भागाचा आमदार म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी या संवेदनशील विषयावर सखोल चर्चा करून कंधार शहरातील हातावर पोट असलेल्या पानपट्टी चालक, चहाचे गाडे यासह इतर छोट्या व्यापाऱ्यांना हक्काची जागा देण्याची मागणी केली होती माझ्या मागणीची जिल्हाधिकारी अभिजीत राहून यांनी दखल घेऊन शहरातील हातावर पोट असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांनी 12 ते 19 ऑगस्ट पर्यंत जागा मिळण्यासाठी फॉर्म भरावे यानंतर सर्व कागदपत्राची पडताळणी करून छोट्या व्यापाऱ्यांना नगरपरिषदेच्या जागेवर दहा बाय पंधरा ची जागा तीन वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले कोणत्याही परिस्थितीत माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य गोरगरीब वंचित उपेक्षित लोकांवर न्याय होणार नाही यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली, यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांची विविध विभागांची शासकीय कामे वेळेत होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी, नागरिकांच्या विविध शासकीय कामास दिरंगाई करीत असलेल्या अधिकारी ,कर्मचाऱ्यांची कदापि गय केली जाणार नसल्याचे आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले , यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांच्या हस्ते कंधार तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना निवडीचे प्रमाणपत्र,सेवानिवृत्त कर्मचारी यांना धनादेश वाटप करण्यात आले, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मयत जनावरे यांच्या अनुदानाचे धनादेश लाभार्थ्यांना देण्यात आले, नवीन शिधापत्रिकाचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले, उत्पन्न व रहिवाशी Ews व जात प्रमाणपत्र NCL प्रमाणपत्राचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या बी एल ओ व सुपरवायझर यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, मतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले, कंधार नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांगांना पाच टक्के निधीचे धनादेश देण्यात आले ,गटविकास अधिकारी पंचायत समिती कंधारच्या वतीने रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी शेततळी, गाय गोठा व इतर लाभार्थ्यांना लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्ते सौ. आशाताई शिंदे यांच्या हस्ते निवड आदेशाचे प्रमाणपत्र देण्यात आले या वेळी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना सामाजिक कार्यकर्त्यां सौ .आशाताई शिंदे म्हणाल्या की, प्रशासन गतिमान होऊन मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी ऑन द स्पॉट सोडवण्यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावा ज्यामुळे खेड्यापाड्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनेचा लाभ लवकर मिळेल व खेड्यापाड्यातील नागरिकांच्या वेळेचीही बचत होईल, व कंधार शहरातील हातावर पोट असलेल्या अनेक छोट्या व्यापाऱ्यांना आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून हक्काची जागा मिळणार असल्याने शहरातील हातावर पोट असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांनी 12 ऑगस्ट 19 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरून तीन वर्षासाठी भाडे तत्त्वावर जागा मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात शहरातील छोट्या व्यापाऱ्यांनी फॉर्म भरावे असे आव्हान यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे अ यांनी केले, यावेळी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वंभर क्षिरसागर, , सतीश कराळे, गिरीश मामडे, विशाल कौशल्ये, व्यंकटी आढाव,अजय हंकारे सह महसूल व वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन लोहाचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले,
Comments
Post a Comment