मडीलगे बुद्रुक येथे संत श्री बाळूमामा पुण्यतिथी सोहळा संपन्न.
मडीलगे बुद्रुक येथे संत श्री बाळूमामा पुण्यतिथी सोहळा संपन्न.
------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरुपा खतकर
------------------------------
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा यांची पुण्यतिथी दिन मडीलगे बुद्रुक येथील भैरी खिंड या ठिकाणी संपन्न झाला.
भुदरगड तालुक्यातील अनेक गावातून भाविक दिवसभर दर्शना साठी येत होते. भजन गीतांनी मंदिर गजबजून गेले होते.
यावेळी सकाळी देवालयाचे मानकरी पुजारी कृष्णात राघू डोणे.महाराज यांनी श्री चरणी सेवा केली. तसेच भाविकांना आपल्या गोडमुखाने मंत्रमुग्ध केले. यावेळी महिलांची उपस्थिती मोठी होती
आठवडा भरापासून देवालयात दररोज पूजा, अर्चा,पारायण वाचन तसेच सायंकाळी प्रवचन, कीर्तन जागर सोहळा संपन्न झाला.
सकाळी देवालयाच्या परिसरात रांगोळी, कमानी सजावट केली होती. सायंकाळी संत बाळूमामा यांच्या प्रतिमेवर भाविकांनी फुले वाहिली. आणि आरती संपन्न झाली.त्या नंतर दत्तपथी भजन सेवा जागर आदी कार्यक्रम संपन्न झाले. रात्री भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
Comments
Post a Comment