भूमिपुत्र ची रविवारला महत्वपुर्ण बैठक.
भूमिपुत्र ची रविवारला महत्वपुर्ण बैठक.
----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजित ठाकुर
----------------------------------
येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वाशिम स्थित जिल्हा कार्यालयांमध्ये भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीमध्ये स्पर्धा परीक्षा बचाव समितीची स्थापना करण्यात येणार असून राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून झालेल्या लोकसभा निवडणुकी सह इतर सर्व निवडणुकांमध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीला बिनाशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील एका विधानसभा मतदार संघाची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटने कडून केली जाणार आहे. महायुती सरकारने घेतलेल्या शेतकरी हिताच्या निर्णयचा अभिनंदन ठराव करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले जाणार आहे. सोयाबीनचे पडलेले दर आणि वैनगंगा - नळगंगा प्रकल्पातून जिल्ह्याला वगळल्यामुळे भूमिपुत्रंकडून आंदोलन हाती घेतले जाणार आहे. सदर आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी व संघटनात्मक बाबींवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी भूमिपुत्र च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रविवार दिनांक 11 ऑगस्टला दुपारी एक वाजता न चुकता वेळेवर उपस्थित रहावे. बैठकीनंतर पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.
Comments
Post a Comment