स्पोर्टस बाईक व पादचारी यांच्या धडकेत पादचारी व बाईक्स्वार ठार.

 स्पोर्टस बाईक व पादचारी यांच्या धडकेत पादचारी व बाईक्स्वार ठार.

----------------------------------------- 

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

अमित खांडेकर 

----------------------------------------- 

आज दुपारी तीनच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिये फाट्यावर मुसळधार पाऊस चालू असताना रस्ता ओलांडताना एका युवकास स्पोर्टस बाईकने जोराची धडक दिल्याने  युवक जागीच ठार झाला आहे. तर स्पोर्टस बाईक वरील युवक गंभीररित्या जखमी झाला असता त्याला उपचारासाठी नेले असता उपचार चालू असताना त्याचा ही मृत्यू झाला.

   घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की किणी ता.हातकणंगले येथील सचिन कुमार चौगुले वय वर्षे 40 हा युवक शिरोली एम आय डी सी येथील कंपनीत कामाला होता. आज दुपारची सेकंड शिफ्ट असल्याने तो कामाला येत असताना शिये फाटा येथे आला असता रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने कोल्हापूर हून पुण्याच्या दिशेने  सौरभ साळोखे,ताराबाई पार्क,कोल्हापूर  हा आपल्या स्पोर्टस बाईक (क्रं. एम एच ०२ ई एम ०१२३) ने पुण्याच्या दिशेने चालला होता. या स्पोर्टस बाईक च्या धडकेत   सचिन  चौगुले हा जागीच ठार झाला.तर स्पोर्टस बाईक स्वार गंभीररीत्या जखमी झाला होता.घटना समजल्यानंतर शिरोली एम आय डी सी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.गंभीर जखमीस  रुग्णवाहिकेतून  सी पी आर ला पाठविले. पण उपचार सुरू असताना गंभीर जखमी सौरभ साळोखे ह्या पण युवकाचा मृत्यू झाला आहे.या घटनेची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.