आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन : बाबा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची मागणी.

 आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन : बाबा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची मागणी.

-----------------------------------

गांधीनगर प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-----------------------------------

बदलापूर येथील लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करवीर तालुक्यात गांधीनगर बाबा ग्रुप च्या वतीने करण्यात आला.गुरुनानक पेट्रोल पंप येथे

 चौकात निदर्शने करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना दिले.राज्यात सुरु असलेले महिलांवरील अत्याचाराचे सत्र आणि बदलापूर येथील लहान मुलीवर अत्याचाराची घटना यामुळे मुंबई परिसर हादरला आहे. बदलापूर मधील शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. 

तसाच प्रकार आज दिनांक 22 रोजी कोल्हापूर येथील शिये मध्ये घडला यामुळे कोल्हापूर व बदलापूर मधील घडलेल्या प्रकारासआमच्या बाबा ग्रुपच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि उद्या कोल्हापूर जिल्हा बंद पुकारल्याने आमचा जाहीर पाठिंबा आहे.असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी माजी डेपोटी सरपंच गुंडा वायदंडे,विनोद फुले ,आकाश ढेरे संतोष माने,

सतीश पवार ,राहुल ढेरे, संतोष माने, अल्पाक शेख, चंद्रकांत हलके, विशाल फुले ,आदि बाबा ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.



फोटो ओळ : निवेदन स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव व बाबा ग्रुपचे पदाधिकारी

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.