करवीर पूर्व भागामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.

 करवीर पूर्व भागामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  यांना अभिवादन.

--------------------------------

गांधीनगर प्रतिनिधी

 विशाल फुले 

-------------------------------


आज साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 104  वी.जयंती करवीर पूर्व भागामध्ये ,डिजिटल फलक लावून

विविध उपक्रमानी उत्साहात संपन्न झाली. 



गडमुडशिंगी  पैकी गांधीनगर  येथील   लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बाबा ग्रुप मंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी 

  पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून स्थानिक नागरिकांच्या उपस्थीत हा कार्यक्रम पार पडला.आण्णा भाऊच्या आठवणीना उजाळा देण्यात आला.

त्यांचं योगदान साहित्य सोबतच कामगार चळवळीत आणि आज तुम्हाला जो मुंबई सह महाराष्ट्र दिसतो आहे. त्यामध्ये योगदान अण्णाभाऊंचे आहे असे प्रतिपादन  माजी उपसरपंच गुंडा वायदंडे यांनी केले. तर मंडळाचे कार्यकर्ते सुभाष ढेरे यांनी लवकरच आपल्या मंडळासाठी ग्रंथालय उभा करावे युवा वर्गाला याचा नक्की फायदा होईल असे बोलले.

 यावेळी रिटेल असोसिएशनचे दिलीप कुकरेजा ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात, बादल वायदंडे  आकाश ढेरे  मोहन माने पिंटू आवळे विपुल माने आकाश लोंढे सुधीर सूर्यवंशी अमर ढेरे राहुल ढेरे अमोल माने आरपीआयचे नितीन कांबळे आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


गांधीनगर येथील  पर्सनल पावर ग्रुप गांधीनगर यांच्या वतीनेे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सतीश माने यांच्या हस्ते ,पुतळ्यास

पुष्पहार अर्पण करण्यात आले .यावेळी सुरेश लोखंडे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार सांगून आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले‌. मंडळाचे अध्यक्ष सुशांत महाजन उपाध्यक्ष आशिष अवघडे , उमेश माने,शुभम लोखंडे, अरुण अवघडे,शुभम कारडा,  संतोष चौगुले,  मंगेश शिंदे,  अभि अवघडे,  सुमित आवळे,  प्रशांत शिंदे,  आदि  उपस्थित होते. 


 गांधीनगर पंचशील तरुण मंडळातर्फे जयंतीनिमित्ताने  होणाऱ्या खर्चाला फाटा देत महापुरामुळे आलेले संकट, लक्षात घेत साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या,  पुतळ्यास घरीच पुष्पहार अर्पण करून शाळेमध्ये शालेय साहित्याबरोबरच  महापूर ग्रस्त लोकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

 यावेळी पंचशील तरुण मंडळाचे अध्यक्ष अनिल हेगड़े, मारिया हेगडे ,स्वप्नाली हेगडे,

  अर्जुन कांबळे, राजू कांबळे आदी  उपस्थित होते.



गांधीनगर ग्रामपंचायत  कार्यालय मध्ये आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली यावेळी माजी सरपंच रितू लालवानी,उपसरपंच विनोद हूजरानी, यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी अरुण हवळ ,अरविंद तामगावे, नितीन माळी,राजू हेडाडे,कुमार कणसे,मधुकर खोत आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित


गडमुडशिंगी येथील लोकशाहीर आण्णा भाऊ युवक संघटना गडमुडशिंगी,याच्या वतीने 

 मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. वाटेगाव येथून   पहाटे ज्योत आणून,  आण्णा भाऊच्या पुतळ्यास सरपंच  ,अश्विनी शिरगावे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.अण्णाभाऊ जरी दीड दिवस शाळेत गेले असले तरी त्यांनी छत्रपती शिवरायांचा पोवाडा रशिया पर्यंत पोहोचवला व महाराष्ट्रात त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्या माणसाच्या मनात घर करून  बसल्या आहेत.असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

उपसरपंच तानाजी पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत एमपीसी यूपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांना,शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय सकटे जितू यशवंत,आधी ग्रामपंचायत सदस्य व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवक संघटना गडमुडशिंगी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



वळिवडे  ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लोकशाहीर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य कपिल घाटगे यांनी अण्णा भाऊंचे विचार, सांगून उजाळा दिला.यावेळी उपसरपंच भैय्या इंगवले, रंजीत कुसाळे अशोक माने महेश मोरे अविनाश साळुंखे आदी  ग्रामपंचायत कर्मचारी कर्मचारी होते.


चिंचवाड  ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सरपंच श्रद्धा पोतदार  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.एवढी उपसरपंच धन्यकुमार पाटील ग्रामपंचायत सदस्य बाबा सरकार सचिन जाधव सरस्वती बिरादार, राहुल पाटील रोहिणी उपाध्य,मेघा पाटील सामाजिक कार्यकर्ते कुलदीप कांबळे आदी  उपस्थित होते.

शांतीनगर येथील शांती तरुण मंडळा तर्फे 

  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,यांच्या प्रतिमेचे अध्यक्ष विजय यादव,उपाध्यक्ष रवी कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून 

 दूध व केळी वाटप करण्यात आले. 

 यावेळी  सुरज साळे,सचिन चौगुले , वीरेंद्र भोपळे,मंडळाचे आदि   कार्यकर्ते उपस्थित   होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.