एमडी प्रवेश परिक्षेत डॉ.श्रध्दा सूर्यकांत मामडेचे घवघवीत यश; आर्य वैश्य समाजाकडून सत्कार.

 एमडी प्रवेश परिक्षेत डॉ.श्रध्दा सूर्यकांत मामडेचे घवघवीत यश; आर्य वैश्य समाजाकडून सत्कार.

---------------------------

लोहा,(प्रतिनिधी

अंबादास पवार 

--------------------------

         डॉ.श्रध्दा सूर्यकांत मामडे एमडी प्रवेश परिक्षेत All India Rank  80 वा नंबर घेऊन घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल तिचा आर्य वैश्य समाजाच्या वतीने नगरेश्वर मंदिर लोहा येथे सत्कार करण्यात आला. आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने नेहमीच विविध उपक्रम राबवून समाजातील विद्यार्थ्यांना मोठं बळ देतात.अन्य समाज विधायक व उल्लेखनीय कामगिरी करण्यात समाज नेहमीच अग्रस्थानी असतो.

         डॉ.श्रध्दा सूर्यकांत मामडे एमडी प्रवेश परिक्षेत All India Rank  80 वा नंबर घेऊन घवघवीत यश प्राप्त करणं म्हणजे समाजासाठी नव्हे तर संपूर्ण लोहा शहर वासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.

      यावेळी आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार,राम सेठ वट्टमवार, रमेश सेठ कोटलवार, काशिनाथ शिर्सिकर,आनंद भोस्कर, लक्ष्मीकांत बिडवई ,मनोज महाजन, विजय तेललवार, सूर्यकांत मामडे , विजयकुमार चन्नावार,पांडूरंग रहाटकर आदी उपस्थितांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.