सहाय्यक प्राध्यापक परीक्षेत दशरथ फाळके उज्वल यश संपादन.
सहाय्यक प्राध्यापक परीक्षेत दशरथ फाळके उज्वल यश संपादन.
-------------------------------
मेढा प्रतिनिधी
शेखर जाधव
-------------------------------
मेढा :-- महाराष्ट्र सेट परीक्षा पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती.त्याचा नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून यामध्ये कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील दशरथ वसंत फाळके यांनी उज्जल यश संपादन केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत सहाय्यक प्राध्यापक पदाची परीक्षा दरवर्षी घेतली जाते.यावर्षीची सेट परीक्षा सात एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आली होती.या परीक्षेला एक लाख 9,250 विद्यार्थी उपस्थित होते.त्यातून 7273 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्या परीक्षेमध्ये दशरथ फाळके यांनी हे यश संपादन केले आहे.दशरथ यांचे शालेय शिक्षण डॉक्टर गदगकर हायस्कूल सातारारोड येथे झाले असून त्यांचे पदवी पर्यंत शिक्षण देऊर कॉलेज व मास्टर ऑफ आर्ट्स (हिस्टरी) विषयाचे शिक्षण शिवाजी कॉलेज सातारा येथे पूर्ण झाले आहे.
दशरथ फाळके यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होऊ लागले आहे.तसेच त्यांच्या यशामध्ये सर्वात मोलाचा वाटा त्यांची पत्नी स्वाती,मुलगा सार्थक व मुलगी स्वराली तसेच शिक्षक व मित्र परिवारांचा राहिला असल्याचे दशरथ फाळके यांनी सांगितले आहे.तसेच सध्या दशरथ फाळके हे वनविभागात वनपाल म्हणून कार्यरत आहेत.या उज्वल यशाबद्दल त्यांचे मित्र मेघना,प्रतीक मोरे,लक्ष्मण सानप,राजेंद्र पवार यांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment