महिलांचा श्रावण महिन्यातील उपक्रम,रत्नेश्वर मंदिरात केला सव्वा लाख शिवलिंग बनविण्याचा विक्रम.

 महिलांचा श्रावण महिन्यातील उपक्रम,रत्नेश्वर मंदिरात केला सव्वा लाख शिवलिंग बनविण्याचा विक्रम.

---------------------------------------

रिसोड तालुका प्रतिनिधी 

 रणजीत सिंह ठाकुर 

---------------------------------------

 श्रावण महिना म्हणजे आनंदाचा, भक्तीचा, श्रद्धेचा आणि संस्कृती रक्षणाचा. श्रावण महिन्यात सर्वत्र शिवभक्ती केली जाते खासकरून सोमवारी सर्व शिवा मंदिरात भक्तांची आलोट गर्दी असते. या भक्ती सागरात बुडालेल्या व शिव आराधनेत तल्लीन झालेल्या रिसोड शहरातील महिलांनी एक अंगाला वेगळा उपक्रम केला. स्थानिक रत्नेश्वर मंदिरात महिलांनी सामूहिक पणे चक्क सव्वा लाख शिवलिंग बनविण्याचा विक्रम केला. या उपक्रमामध्ये माहेश्वरी महिलां मंडळा सह अमृताताई देशमुख, प्रमिला गट्टणी, सुनीता नंदकुळे, शिवकन्या गोरटे, शारदा काबरा, प्रेमा कासट, तारा तोष्णीवाल, मीरा खुरपे, लता नंदकुले इत्यादी महिला सहभागी झाल्या होत्या.

 महिला संपूर्ण श्रावण महिन्यात मोठया आनंद उत्साहात भक्तीभावाने उपासना करुन अध्यात्मिक संस्काराचे आदर्श पुढील पिढीत रुजविण्याचे कार्य विविध उपक्रमाद्वारे करित असतात.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.