श्रावण मास तीर्थाठण करा लाल परी सोबत राधानगरी आगार प्रमुख उत्तम पाटील.
श्रावण मास तीर्थाठण करा लाल परी सोबत राधानगरी आगार प्रमुख उत्तम पाटील.
-------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------
राधानगरी एसटी आगार मार्फत श्रावण महिना निमित्त भाविकांसाठी विविध तीर्थाठण करण्यासाठी आगारातील लालपरी एसटी सोबत योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती राधानगरी एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक उत्तम पाटील यांनी दिली
राधानगरी एसटी आगारा मार्फत श्रावण मास तीर्थाठण करण्यासाठी भाविकांना एक दिवसाची अकरा मारुती दर्शन मारलेश्वर गणपतीपुळे दर्शन दत्त नूसिंहवाडी औदुंबर खिद्रापूर आळते दर्शन तसेच दोन दिवसाची पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट या ठिकाणी जाण्यासाठी लालपरी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे
तरी सदर योजने मध्ये महिलांकरता महिला सन्मान योजनेअंतर्गत 50% प्रवास भाडे व 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना करिता अमृत ज्येष्ठ नागरिक शंभर टक्के सवलत मध्ये उपलब्ध करून लालपरी बस देण्यात येणार आहे याकरिता तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत दूध संस्था महिला बचत गट महिला मंडळ यांनी या योजनेचा लाभ घेण्यात यावा असे आव्हान राधानगरी एसटी आगारा मार्फत करण्यात येत आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान आगार प्रमुख उत्तम पाटील यांनी केले आहे
Comments
Post a Comment