शहरात मुरुम टाकून मुख्य रस्त्यांचे पॅचवर्कची कामे सुरु.
शहरात मुरुम टाकून मुख्य रस्त्यांचे पॅचवर्कची कामे सुरु.
--------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
कु.श्रृती सचिन कुंभार
--------------------------------
कोल्हापूर ता.03 : शहरामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे तातडीने मुजविण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहर अभियंता व सर्व उप-शहर अभियंत्यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत मुख्य रस्ते मुरुम टाकून पॅचवर्क करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये आज विभागीय कार्यालय क्र.1 अंतर्गत विश्वपंढरी देवालय ते हॉकी स्टेडियम चौक, आयसोलेश हॉस्पिटल ते शेंडापार्क, कळंबा जेल मेनरोड. विभागीय कार्यालय क्र.2 अंतर्गत ब्रम्हपूरी, डी मार्ट ते फुलेवाडी मेनरोड. विभागीय कार्यालय क्र.3 अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, टाकाळा, परिखपूल. विभागीय कार्यालय क्र.4 अंतर्गत सीबीएस स्टॅण्ड, पदमा पथक चौक, इंजिनिअरींग कॉलेज मेनरोड, लाईन बझार, भगवा चौक मेन रोड परिसरात मुरुम टाकून पॅचवर्क करण्यात आले आहे. सदरचे पॅचवर्क अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे व शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर के पाटील, सतिश फप्पे, महादेव फुलारी यांनी करुन घेतले आहे.
Comments
Post a Comment