खानापूर विधानसभा मतदार संघात ब्रह्मानंद पडळकर यांचा बोलबाला यंदा बदल होणार, आमदार ब्रह्मानंद पडळकरच होणार, कार्यकर्त्यांनी दिला नारा
खानापूर विधानसभा मतदार संघात ब्रह्मानंद पडळकर यांचा बोलबाला यंदा बदल होणार, आमदार ब्रह्मानंद पडळकरच होणार, कार्यकर्त्यांनी दिला नारा
---------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------------
खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचा सध्या बोलबाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जनतेतून त्यांना आता मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
2024 च्या विधानसभेमध्ये यंदा बदल घडवणारच याच इशाऱ्याने सर्व जनता व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.जनतेतून यंदा उठाव होत आहे. जनतेतून आता उठाव होत असून 2024 ला खानापूर विधानसभा मतदारसंघातून ब्रह्मानंद पडळकर आमदार होणार असल्याचा नारा दिला जात आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून समाजकारण करत असताना विकासात्मक राजकारण करण्याकडे पडळकर बंधून केलेल्या कामातूनच ते जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहेत.
विधानसभा परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये बहुजन समाजाची मुठ बांधली आहे. विविध समाजाच्या महामंडळाची मागणी विधान परिषदेत लावून धरल्याने सर्व अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळाला आहे. याचबरोबर वंचित शोषित,उपेक्षित समाजाला न्याय देण्याची भूमिका पडळकर बंधूंनी नेहमीच ठेवली आहे. याच पावलावर पाऊल ठेवत समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह जनतेला विकास काय असतो ते दाखवून देत गावापर्यंत विकासाची गंगा पोहोचवली आहे.
आतापर्यंत खानापूर विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापित नेते मंडळींनी जनतेला गृहीत धरूनच राजकारण केले आहे. या राजकारणाला फाटा देत पडळकर बंधूंनी सर्वसामान्य जनतेच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचवली आहे. पडळकर बंधूंना जनतेतून आता पाठबळ मिळत असून खानापूर घाटमाथा विसापूर सर्कल व विटा शहरातून ही मोठ्या प्रमाणात जनाधार मिळत आहे. नेतेमंडळी सह आता जनता जनार्दनाच जागृत झाले आहे. त्यामुळे यंदा काही झालं तरी ब्रह्मानंद पडळकर यांना खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार करणारच हा नाराज जनतेने दिला आहे..
आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातील गावात जाऊन प्रत्यक्ष भेट देत निधी दिला आहे. त्याबरोबरच प्रत्येक समाजाच्या नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र उपलब्ध असल्याचे ग्वाही दिले आहे. त्यामुळे सध्या पडळकर बंधूंच्याकडे मतदार संघातून ओढ वाढू लागला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी आता वाढत असलेला पाठिंबा व प्रभाकर बंधूंच्या रूपाने 2024 चा खानापूर विधानसभेचा आमदार होणार असल्याने विकास हा मोठ्या प्रमाणात खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये होईल हा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे...
Comments
Post a Comment