कोलकाता पीडित महिला डॉक्टर खून प्रकरणातील नराधमांना फाशी द्यावी पत्रकार संघटनेची मागणी.
कोलकाता पीडित महिला डॉक्टर खून प्रकरणातील नराधमांना फाशी द्यावी पत्रकार संघटनेची मागणी.
------------------------------------
रिसोड/ प्रतिनिधी
रणजित ठाकूर
--------------------------------------
भारतीय सभ्यता व संस्कृतीला काळिमा फासणारी घटना पश्चिम बंगाल राज्याची राजधानी असलेल्या कोलकाता शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात घडली.एका एकतीस वर्षीय पदवीत्तर शिक्षण घेणाऱ्या शिकाऊ महिला डॉक्टर वर अमानुष लैंगिक अत्याचार करुन तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना एवढी विद्रावक आहे की त्या प्रकरणातील दोषींना कितीही कठोर शिक्षा केली तरी कमीच वाटेल.या काळजाला पीळ देण्याऱ्या घटनेचा श्रमिक पत्रकार संघ रिसोड तालुका व इतर संघटनेच्या पत्रकारांनी एकत्रित येत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. व निवेदणाद्वारे देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्म यांच्याकडे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मार्फत या प्रकरणातील आरोपीना मरेपर्यंत फाशी देण्याची मागणी करण्यात आली.त्यानंतर शोक सभेचे आयोजन करुन महिला डॉक्टर ला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व पुन्हा अशा घटना देशात कुठेही होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.प्रसंगी श्रमिक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रवि अंभोरे, उपाध्यक्ष राहुल जुमडे, सहसचिव आत्माराम जाधव, कार्याध्यक्ष रणजितसिंग ठाकूर, प्रसिद्धी प्रमुख अजय कानडे, कोषध्यक्ष गोपाल खडसे, संघटक गजानन साळेगावकर, संघटक शेख फय्याज, सहसंघटक शेख तौसिफ़, तालुका पत्रकार संघांचे गजाननराव खंदारे, काशिनाथजी कोकाटे (केके ), महाराष्ट्ट राज्य पत्रकार संघांचे केशव गरकळ,कैलास महाजन इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
Comments
Post a Comment