लोणंद पोलीसांची एकावर तडीपारीची कारवाई.

 लोणंद पोलीसांची एकावर तडीपारीची कारवाई.

-----------------------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर

 ---------------------------------------

सातारा जिल्हयातील लोणंद पोलीस स्टेशन हददीतील शरीराविरुध्दचे गुन्हे करणा-या दिपक कुंडलिक धायगुडे यास सहा महिन्यांकरीता केले हददपार


 पोलीस अधीक्षक  सातारा समीर शेख,  अप्पर पोलीस अधीक्षक  आंचल दलाल मॅडम, यांनी सातारा जिल्ह्यातील शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांना तडीपार करण्याचे आदेश दिल्याने सातारा जिल्हयातील लोणंद पोलीस ठाणे हद्दीत सातत्याने शरीराविरुध्दचे गुन्हे करणारा दिपक कुंडलिक धायगुडे रा.सुखेड ता. खंडाळा जि. सातारा याचे विरुध्द दुखापत, विनयभंग, शिवीगाळ, दमदाटी करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुशिल बी भोसले सहा. पोलीस निरीक्षक यांनी सदर इसमाविरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे सदर इसमास सातारा, सोलापुर जिल्हा तसेच पुणे जिल्हयातुन पुरंदर व बारामती तालुक्यातुन सहा महिने मुदतीकरीता हददपार करणेत यावे याबाबतचा प्रस्ताव चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांना पाठवण्यात आलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी - फलटण यांनी केलेली आहे.


सदर इसमावर दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्याचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृतीत कोणताही बदल झाला नाही. त्याचेवर कायदयाचा कोणताच धाक राहिला नाही. परीसरातील लोकांना त्रास होवु लागल्याने सर्वसामान्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.


सदर इसमाला सातारा, सोलापुर जिल्हा तसेच पुणे जिल्हयातुन पुरंदर व बारामती तालुक्यातुन सहा महिने मुदतीकरीता हददपार आदेश उपविभागीय दंडाधिकारी वाई उपविभाग वाई यांनी पारीत केला आहे. नोव्हेंबर २०२२ पासुन ५५ प्रमाणे २९ उपद्रवी टोळयामधिल ९४ इसमांना मपोकाक ५६ प्रमाणे २९

इसमांना मपोकाक ५७ प्रमाणे ३ इसमांना असे एकुण १२६ इसमांनविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन भविष्यातही सातारा जिल्हयामधिल सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी मोक्का एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.


याकामी हददपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा. संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काले, केतन लाळगे, नितीन भोसले, अभिजीत घनवट यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.