मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा - रामहरी राऊत.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा - रामहरी राऊत.
----------------------------
लोहा प्रतिनीधी
अंबादास पवार
----------------------------
राज्य सरकारच्या वतीने राज्यात लोक हितकारी योजना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत राज्यभरात आतापर्यंत ३०१ कोटी रुपयांचे तर नांदेड जिल्ह्यात साडे पाच कोटी रुपयांचे वितरण झाले असल्याचे सांगून गरजू रुग्णांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी मुख्यमंत्री कार्यालय मुंबई कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी केले.
लोहा शहरातील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे, शहरप्रमुख सतीश आणेराव, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष अन्सार भाई पठाण, महेश पाटील कराळे आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवेदनशील मुख्यमंत्री असुन राज्यातील गोरगरीब रुग्ण पैशाअभावी वैद्यकीय उपचाराशिवाय वंचीत राहू नये यासाठी शासनामार्फत योजना राबविण्यात येत आहेत. कोणत्याही शासकिय किंवा खाजगी रुग्णालयात किडनी, कॅन्सर, अपघात, फुफ्फुस, यकृत, गुडगे, हृदय रोग आदी आजारांवर मोफत १ लक्ष रुपयांपर्यंतचा इलाज करता येतो.
सदरील योजना निःशुल्क असून योजनेचा लाभ सर्व गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन राऊत यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे, युवराज वाघमारे, भुजंग पाटील हिलाल, विलास, तेलंग, शिवराज दाढेल आदींची उपस्थिती होती
Comments
Post a Comment