सातारा : देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोंडारवाडी प्रकल्पासंदर्भात चर्चा करताना शिवेंद्रसिंहराजे भोसले. त्या वेळी ज्ञानदेव रांजणे, आदिनाथ ओंबळे, सागर धनावडे, श्रीरंग बैलकर व कृती समितीचे सभासद.
सातारा : देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोंडारवाडी प्रकल्पासंदर्भात चर्चा करताना शिवेंद्रसिंहराजे भोसले. त्या वेळी ज्ञानदेव रांजणे, आदिनाथ ओंबळे, सागर धनावडे, श्रीरंग बैलकर व कृती समितीचे सभासद.
-----------------------------------------
मेढा प्रतिनिधी
शेखर जाधव
-----------------------------------------
बोंडारवाडी प्रकल्पाला मान्यता देणार : फडणवीस
विधानसभेपूर्वी प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही
मेढा ता. ९ : जावळी तालुक्यातील ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार म्हणून काम करत आहे. विधानसभा निवडणुकीआधी बोंडारवाडी प्रकल्पास राज्य सरकार मान्यता देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आज सातारा येथे एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आले असता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत धरण कृती समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी कृती समितीशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, "या प्रकल्पासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे जी कामे सांगतात ती सरकारच्या वतीने मार्गी लावली जातात. त्यामुळे जावळी तालुक्यातील हा महत्त्वाचा प्रश्न विधानसभा निवडणुकीच्या आधी निश्चित मार्गी लावला जाईल." यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, कृती समितीचे आदिनाथ ओंबळे, विलास शिर्के, श्रीरंग बैलकर, राजू जाधव, सुरेश कासुर्डे, बजरंग चौधरी, सागर धनावडे यांच्यासह कृती समितीचे सभासद उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून हा प्रकल्प विधानसभा निवडणुकीपूर्वी निश्चित मार्गी लागेल, असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक
रांजणे यांनी यावेळी व्यक्त केला.
Comments
Post a Comment