युवासेनेच्या तालुकाधिकारी पदी उपसरपंच गजानन मोरे यांची नियुक्ती.

 युवासेनेच्या तालुकाधिकारी पदी उपसरपंच गजानन मोरे यांची नियुक्ती.

-------------------------

लोहा,(प्रतिनिधी)

अंबादास पवार 

-------------------------

        सामाजिक,राजकीय क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे निळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच युवा शिवसैनिक गजानन पाटील मोरे यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित युवा सेनेच्या लोहा तालुकाधिकारी पदी नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ दादा पवार यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे.

        उपसरपंच गजानन पाटील मोरे हे एकनाथ दादा पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत त्यांनी एकनाथ दादा पवार  यांच्या सोबत गेली ४ वर्षांपासून कार्यरत असून मन्याड फाऊंडेशन मध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. एकनाथ दादा पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गजानन पाटील मोरे यांनी ही शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेनेच्या विविध कार्यक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेना उबाठा पक्षाने त्यांची युवासेनेच्या लोहा तालुकाधिकारी पदी नियुक्ती केली आहे.

        त्यांच्या नियुक्ती बद्दल शिवसेना उबाठा चे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ दादा पवार, लोहा कृउबा समितीचे संचालक साहेबराव पाटील काळे, शिवसेनेचे लोहा शहरप्रमुख खंडू पाटील पवार,रुद्रा पाटील भोस्कर यांसह मित्रमंडळीनी स्वागत केले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.