राधानगरी तालुक्यामध्ये विविध मंडळांनी या वर्षीचा गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करावा पोलीस निरीक्षक संतोष गोरे.
राधानगरी तालुक्यामध्ये विविध मंडळांनी या वर्षीचा गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करावा पोलीस निरीक्षक संतोष गोरे.
------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------
राधानगरी तालुक्यातील यंदा गणेशोत्सव विविध मंडळांनी डॉल्बीमुक्त करावा आशा सूचना तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या राधानगरी पोलीस स्टेशन मध्ये आयोजित केलेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी देण्यात आले
राधानगरी तालुक्यातील सरवडे राशिवडे राधानगरी कसबा वाळवे चार गावांमध्ये मोठी मंडळ असल्याने या गावातील मंडळाने या वर्षी 7 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था आबादी रहावी म्हणून राधानगरी पोलीस ठाणे अंतर्गत ठाण्यांतर्गत वरील गावातील गणेश मंडळांनी या वर्षी डॉल्बी मुक्त करावी पारंपारिक वाद्याचा वापर करावा गणेश मूर्ती लहान व आकर्षक असावी मूर्ती प्रतिष्ठान ठिकाणी दोन दिवसा व रात्री दोन स्वयंसेवक हजर ठेवावे सोशल मीडियावर कोणतेही अक्षेपाई पोस्ट प्रसारित करू नये मिरवणूक वेळेत काढून गणेश विसर्जन करावे मंडळांनी मिरवणुकी मागे पुढे घेण्याच्या कारणावरून वाद विवाद करू नये जी मंडळी ध्वनी प्रदूषण करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना मंडळाच्या कार्यकर्त्यांना या बैठकीत देण्यात आल्या
राधानगरी तालुक्यातील गणेश उत्सव सण शांततेने पार पाडून पोलिसाला सहकार्य करावे असे आवाहन राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी केले आहे
या बैठकीस राधानगरी पोलीस स्टेशनचे सा पोलीस निरीक्षक खंडू राव गायकवाड व तालुक्यातील विविध मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते
Comments
Post a Comment