कौलव येथे होणाऱ्या नियोजित एम आय डी सी विरोधात आजपासुन बेमुदत उपोषण सुरू.
कौलव येथे होणाऱ्या नियोजित एम आय डी सी विरोधात आजपासुन बेमुदत उपोषण सुरू.
------------------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे)
-----------------------------------------
राधानगरी तालुक्यातील कौलव येथे होणाऱ्या नियोजित एम आय डी सी ला सर्व ग्रामस्थांचा विरोध असुन,हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी कौलव येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व पक्षीय नेतेमंडळींनी जिल्हाधिकारी अमोल येडगे व औद्योगिक विकास महामंडळाचे प्रमुख राहूल भिंगारे यांची भेट घेऊन निवेदन द्वारे केली होती याबाबत निर्णय झाला नसल्याने आज ९ आॕगस्ट पासुन कौलव येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या उपोषणाला सुरुवात केली.
सदर उपोषणास गावातील शेतकरी महेश पाटील व योगेश पाटील आजपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत.
या निमित्त राधानगरी पंचायत समिती चे माजी उप सभापती मा. श्री रविश पाटील. भोगावती साखर कारखान्यांचे माजी अध्यक्ष श्री सदाशिवराव चरापले. भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक श्री धैर्यशिलदादा पाटील. श्री सुशील पाटील. गावाचे ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील. श्री बाबासो पाटील. श्री के. द. पाटील.मनोज पाटील ,नानासो पाटील. सागर पाटील. महेश पाटील. आणाप्पा चौगले. संजय नाधवडे. योगेश पाटील. राजेंद्र पाटील. रमेश पाटील. निवास हुजरे. विनायक चरापले. तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वांनी एकमुखाने सदर उपोषणास पाठिंबा जाहीर केला यावेळी गोकुळचे संचालक रणजीतदादा पाटील मुदाळकर यांनी उपोषण ठिकाणी पाठिंबा जाहीर करून या लढाईत सक्रिय राहून, न्यायालयीन किंवा प्रशासकीय मदत लागल्यास तातडीने मदत करू असे आश्वासन दिले यावेळी प्रशासनाने दखल नाही घेतली तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment