पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या चार म्हशींचा मृत्यू.

 पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या चार म्हशींचा मृत्यू.


---------------------------------

चंदगड प्रतिनिधी

आशिष पाटील 

---------------------------------

चंदगड तालुक्यातील उमगाव पैकी सावतवाडी येथील शेतकरी कुटुंबावर संकट.

         चंदगड : सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस असल्यामुळे नेहमी जांबरे भागांत पूरजन्य परिस्थीती असते. अशातच एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांच्या ४ म्हशी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या. त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.


चंदगड तालुक्यांतील उमगांव येथील हिरगा रामा गावडे (रा.सावतवाडी) या शेतकऱ्याच्या म्हशी चरायला गेल्या असताना हा आकस्मिक प्रकार घडून आला. यावेळी सर्व म्हशी तेथील पूराच्या पाण्यातून वाहून गेल्या. त्यातील सापडलेल्या मृत जनावरांना काही काळाने दफन करण्यात आले. सदर घटनेची दखल घेऊन प्रशासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.