चोरीचे होत असलेले प्रयत्न आणि अपहरण पार्श्वभूमीवर गस्त वाढवावी मुरगुड मधील नागरिकांचे निवेदनाद्वारे पोलीस स्टेशनला आवाहन.
चोरीचे होत असलेले प्रयत्न आणि अपहरण पार्श्वभूमीवर गस्त वाढवावी मुरगुड मधील नागरिकांचे निवेदनाद्वारे पोलीस स्टेशनला आवाहन.
--------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
--------------------------------
शहरामध्ये चोरीचे होत असलेले प्रयत्न आणि शहरामध्ये घडलेला अपहरणाचा प्रकार या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी असे आवाहन मुरगुड शहरातील नागरिकांनी मुरगुड पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे केले यावेळी मुरगूड पोलीस स्टेशनचे एपीआय शिवाजी करे यांनी निवेदन स्वीकारले आणि गस्त वाढवण्याचे आवाहन उपस्थितांना दिले. मुरगूड शहरांमध्ये आठवडी बाजार आणि रात्रीच्या वेळी चोरीचे प्रकार घडत आहेत यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत तसेच शहरात घडलेला अपहरणाच्या प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आठवडी बाजारामध्ये पैसे आणि मोबाईल चोरीला जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यामुळे बाजारामध्ये येणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे शहरांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे यामुळे शहरातील नागरिक व्यापारी शिवभक्त यांनी मुरगुड पोलीस स्टेशनला जास्त वाढवावी असे निवेदनाद्वारे आवाहन केले आहे यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट ओंकार पोतदार, दगडू शेणवी, दत्ता मंडलिक, बजरंग सोनुर्ले, अनिल सिद्धेश्वर, विशाल मंडलिक , संकेत शहा, पंकज नेसरीकर अजित चौगुले सौरभ भारमल यांच्यासह नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment