भारत देशातून सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल जवाहर कारखान्यास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार -आ.प्रकाश आवाडे.

 भारत देशातून सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल जवाहर कारखान्यास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार -आ.प्रकाश आवाडे.


------------------------------ 

हातकणंगले प्रतिनिधी

विनोद शिंगे 

------------------------------ 

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने आयोजित साखर उद्योग परिसंवाद व कार्यक्षमता पुरस्कार सोहळा २०२२-२३ आज दिल्ली येथे केंद्रीय उत्तर गृहमंत्री व सहकारमंत्री मा. अमितभाई शाहजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 


*कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास २०२२-२३ या ३० व्या हंगामात देशातून सर्वाधिक साखर निर्यात केल्याबद्दल नॅशनल फेडरेशन, नवी दिल्ली या संस्थेकडून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्रीकृष्ण पालजी व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कारखान्याचे तज्ञ संचालक आमदार प्रकाशआण्णा आवाडे व केन कमिटीचे चेअरमन डॉ राहुल डब आवाडे  यांनी स्वीकारला.*


यावेळी कारखान्याचे व्हा चेअरमन बाबासो चौगुले, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, कु. सानिका आवाडे दीदी, संचालक   आडगोंडा पाटील, सुकुमार किनिंगे, दादासो सांगावे, सुरज बेडगे, शितल अम्मन्नावर, संजयकुमार कोथळी, गौतम इंगळे, सुमेरू पाटील, उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.