मनसे पार्टी चा स्थानिक नेता असून मला पक्षातून तिकीट साठी डावले.... प्रकाश बोरकर.
मनसे पार्टी चा स्थानिक नेता असून मला पक्षातून तिकीट साठी डावले.... प्रकाश बोरकर.
----------------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
----------------------------------------------
*"जय महाराष्ट्र"*
मी एक सर्वसामान्य घराण्यातील आपल्याच राजुरा विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या गडचांदूर शहरातील वास्तव्यास असणारा एक प्रामाणिक कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत माझी नोकरी आहे. मित्रांनो सण 2009 पासून या परिसरात गोर -गरीब नागरिकांची, शेतकऱ्यांची, कामगारांची, सुशिक्षित बेरोजगार युवकांची जाण असणारा सर्वांना सोबत घेऊन चालणारा या परिसरात मनसे पक्ष आज पर्यंत जिवंत ठेवणारा मनसे पक्षात आज पर्यंत असे कितीतरी आलेत आणि गेलेत परंतु आपण एका निष्ठेने जीवाची किंवा कुटुंबाची परवा न करता नांदा ग्रामपंचायत येथे सत्ता आहे व सत्तेत सहभागी सुद्धा आहे तसेच आवाळपुर येथे ग्रामपंचायत सदस्य आहे या पूर्वी कोरपणा तालुक्यातील गोविंदपुर खैरगाव येथे ग्रामपंचायत सदस्य होते सन 2012 मध्ये शीला गौतम धोटे यांना नांदा बाखर्डी जिल्हा परिषद लढविण्यात आली नगरपरिषद गडचांदूर येथे राजूभाऊ खटोड यांच्या नेतृत्वात मनसे ची निवडणूक लढविण्यात आली,महालिंग कंठाळे यांच्या नेतृत्वात सुद्धा नगरपरिषदेत उमेदवार उभे करण्यात आले. जिवती तालुका येथे महिला आघाडी तालुका अध्यक्ष शिवगंगा मठपती, मोगावे ताई, नागेश खांडेकर, नंदेवार ताई, यांच्या नेतृत्वात सर्वाधिक गाव तिथे शाखा खोलण्यात आल्या जिवती तालुक्यातील घरकुलाचा प्रश्न असो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा जिवती तालुका हा वन विभाग मुक्त झाला पाहिजे याचा प्रश्न असो असे एक ना अनेक प्रश्न घेऊन जीवती तहसील कार्यालयावर मोर्चे ही काढण्यात आले शंकर पठार येथील एम एस सी बी च्या हलगर्जी पणामुळे एका बालकाला करंट लागल्याने त्या बालकाला त्याचा मोबदलाही मिळवून देण्यात आला.
कोरपणा तालुक्यातील गाडेगाव येथील स्थानिक स्थानिक बेरोजगार युवकांसाठी आमरण उपोषणही करण्यात आले व तिथे यश ही मिळाले नांदा पिंपळगाव रस्त्यासाठी असो किंवा गडचांदूर बीबी नांदा फाटा आवळपूर रस्त्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करून रस्त्याचे काम करण्यात आले आंदोलनाला यश मिळाले सतत ये जा करीत असलेल्या लाईन संदर्भात एम एस ई बी गडचांदूर कार्यालय येथे मोर्चे ही काढण्यात आले. असे एक ना अनेक मुद्दे घेऊन आंदोलन करण्यात आले आणि ते यशस्वी केले आंदोलन करीत असताना अंगावर 10 ते 15 गुन्हे दाखल झालेत त्या गुण्याला न घाबरता पक्षातील वरिष्ठ नेत्यांची साथ नसताना सुद्धा एक मनसैनिक म्हणून एका निष्ठेने काम करीत राहीलो कोरोना काळात ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशा 200 ते 300 गरजू व्यक्तींना धान्य वाटप करण्यात आले. मित्रांनो यावेळेस राजुरा विधानसभेची तिकीट पक्षाला मागितली होती कदाचित होऊ शकते आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी किंवा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले नाव सन्माननीय राज साहेबां पर्यंत पोहोचविले किंवा नाही हे त्यांनाच माहित असो या राजुरा विधानसभा क्षेत्रात आज पर्यंत इथल्या नागरिकांनी अनेक पक्षांच्या नेत्यांना विधानसभेत जाण्याची संधी दिली कुणाला एक दा दोन दा तर कुणाला तीन दा संधी दिली परंतु त्या नेत्यांनी कधी येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न वीज दरवाढीचे प्रश्न जिवती तालुका वन विभाग मुक्त करण्याच्या संदर्भातला प्रश्न गडचांदूर प्रदूषण मुक्त करण्याचा प्रश्न बस स्थानकाचा प्रश्न क्रीडांगणाचा प्रश्न जिवती गोंडपिपरी तालुका येथे लहान मोठे उद्योग आणून तिथल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे याचा प्रश्न कोरपणा येथे सुंदर बस स्थानक व्हावे याचा प्रश्न कधी विधानसभेत मांडलेला नाही केवळ त्यांनी आज पर्यंत फक्त आणि फक्त तुमच्या मतांचा वापर करून आपल्या सात पिढ्या बसून खाईल या साठी कुणी शाळा तर कोणी कॉलेज अशा एक ना अनेक संस्था आणून आत्ता पर्यंत आपलीच घरे भरल्याचे दिसत आहे. मित्रांनो आता वेळ आली आहे यांना घरी बसवण्याची जरी मला पक्षांनी तिकीट दिली नसेल जर का आपला आशीर्वाद माझ्या पाठीमागे असेल तर नक्की मी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यास तयार आहे व इथल्या जनतेचे प्रश्न सोडविण्यास सदैव तयार आहे. मी आश्वासन नाही शपथ पत्र देतो
आपला
चंद्रप्रकाश चंद्रहास बोरकर
ग्रा. पं. सदस्य नांदा
Comments
Post a Comment