चाफोडी येथील शेतकऱ्यांच्या अंगावर झाड पडूनही शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांचा आरोप.

 चाफोडी येथील शेतकऱ्यांच्या अंगावर झाड पडूनही शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांचा आरोप.

----------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे.

----------------------------

राधानगरी तालुक्यातील चाफोडी येथील शेतकऱ्यांच्या अंगावर रस्त्यावरील झाड पडून एक महिना झालं तरी या संदर्भात शासकीय अधिकारांना कळवून त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप व तातडीने शासकीय मदत देऊन त्या शेतकऱ्याचा प्राण वाचवावा अन्यथा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे


अधिक माहिती अशी की चाफोडी येथील शेतकरी संदीप दत्तात्रय सारंग हे आपल्या शेताकडे 15 जुलै 24 रोजी सकाळी जात असताना अचानक रस्त्यावरील झाड त्याच्या अंगावर पडल्याने तो गंभीर त्या जखमी झाला त्याला तातडीने खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले परंतु त्या दवाखाना खर्च जखमी संदीप सारंग यांना परवडणारा नसल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून घरी पाठवून देण्यात आले परंतु जखमी संदीप सारंग हा सध्या आपल्या घरी कॉटवर झोपून असल्याने जखमीस संदीप सारंग त्यांची परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्या आई-वडिलांनी दुपती जनावर विकूनही दवाखानाचा खर्च भागात नसल्याने यासंबंधी मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी व शासकीय अधिकारी त्यांच्याकडे शासकीय मदतीसाठी कळवले परंतु त्याकडे शासकीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने त्या शेतकऱ्यास तातडीने मदत देऊन त्या शेतकऱ्याचे प्राण वाचवावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.