मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन ; हिंगोलीच्या कावड उत्सवासाठी रवाना.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन ; हिंगोलीच्या कावड उत्सवासाठी रवाना.
------------------------------लोहा प्रतिनिधी
अंबादास पवार
------------------------------
नांदेड, दि. 12 ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी दुपारी 4 वाजता नांदेड, हिंगोली जिल्हाच्या दौ-यावर आगमन झाले. श्री गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
नांदेड विमानतळावर आ.बालाजी कल्याणकर,माजी खासदार हेमंत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगर पालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. पोलिसांची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर नांदेड येथून मोटारीने अग्रसेन चौक, हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित कावड यात्रेस उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना झालेत.
***
Comments
Post a Comment