Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सांगलीतील जामवाडीत निर्घृण खून.

 सांगलीतील जामवाडीत निर्घृण खून.

-------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम 

-------------------------------------

अनिकेत हिप्परकर वर कोयत्याचे घाव. निर्घृण खून सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे सर टीम घटनास्थळी तत्पर रवाना खूनाचे कारण स्पष्ट..


शहरातील जामवाडी येथील मरगुबाई मंदिराजवळ पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एका तरुणाचा कोयत्याने डोक्यात वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. हनुमान जयंतीला झालेल्या वादातून पाच जणांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सांगली शहराचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिले. 

अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय 22 रा. जामवाडी सांगली,) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिकेत एका आर्थिक संस्थेत पिंगमी एजंट म्हणून काम करत होता. जामवाडीतील एका सार्वजनिक मंडळात ही तो सक्रिय होता. काही महिन्यापूर्वी झालेल्या हनुमान जयंती वेळी त्याचं मंडळातील काही मुलांशी वाद झाला होता. त्यातून त्यांनी एकाला कानाखाली मारली होती. त्याचा राग त्या मुलांना होता. 

मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तो जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळ थांबला होता. त्यावेळी संशयित अल्पवयीन मुले तिथे आली.  त्यांनी पूर्वी झालेल्या वादाचा जाब त्याला विचारला. त्यावरून त्याच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर संशयित दोन मुलांनी अनिकेत वर दोन कोयत्यांनी सपासप वार केला. त्यातील वार वर्मी बसल्याने अनिकेत तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर संशयीत मुले तेथून पसार झाली.

या घटनेची माहिती मिळताच उपधीक्षक जाधव, सांगली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे, एलसीबी चे निरीक्षक सतीश शिंदे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी काही पथके संशयताच्या शोधासाठी पाठवण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा खून पाच अल्पवयीन मुलांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. 

प्राथमिक चौकशीत हनुमान जयंतीला झालेल्या वादातून अनिकेत चा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्याच्याकडे कसून तपास करीत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते..

Post a Comment

0 Comments