अखेर विश्वजीत दिंगबंरे यांचे वळिवडे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द.
अखेर विश्वजीत दिंगबंरे यांचे वळिवडे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
--------------------------------
मा. जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांच्या आदेशाने विश्वजीत सन्मत दिगंबरे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती कोल्हापूर यांनी दिनांक 9 /11/ 2023 रोजी अवैध ठरवले असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 10 (1-अ)नुसार मौजे वळीवडे ता- करवीर ग्रामपंचायत सदस्य पदी झालेली निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली. असल्याचे मानण्यात येऊन ते ग्रामपंचायत सदस्य पदी अपात्र असल्याचे घोषित करण्यात येत आहे.तसेच मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर याचे न्यायालयात विवाद अर्ज 00107/2023 दिनांक 21/11/2023 रोजी सदस्यपद रद्द करण्याकरीता अर्ज दाखल केले होते. त्यामुळे विश्वजीत सन्मत दिगंबरे यांचे सदस्य पद रद्द झाले असलेचे मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिनांक 29/7/2024 रोजी आदेश दिला आहे.
यांच्याविरोधात प्रकाश रावसो शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती तसेच या कामी अॅड.सूर्यकांत चौगुले साहेब यांनी कामकाज पाहिले आहे.
Comments
Post a Comment