घरगुती भांडणातून पाचगाव मध्ये भावाने केला भावाचा खून पाचगाव मधील घटना.

घरगुती भांडणातून पाचगाव मध्ये भावाने केला भावाचा खून पाचगाव मधील घटना.


मयत सागर कुंभार.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार

-------------------------------------

आज दिनांक 20/8/2024


वैभव कुंभार.

घरगुती भांडणातून भावाने भावाचा खून केल्याची घटना आज पाचगाव मधील पोवार कॉलनी मध्ये घडली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की. सागर जयसिंग कुंभार वैभव जयसिंग कुंभार हे दोघे जण पाचगाव मधील पोवार कॉलनी येथे एकत्र राहतात आज दुपारी चारच्या सुमारास वैभव याने सागर याला घरातून बाहेर काढून त्याच्या अंगावर मोटार सायकल ढकलली मोटरसायकल खाली अडकल्यामुळे सागर यास आपला बचाव करता आला नाही हीच संधी साधून वैभवणे मोटरसायकलचा चीन कव्हर काढून सागर याच्या चेहऱ्यावर व डोक्यात वर्मी घाव घातले वर्मी घाव बसल्यामुळे सागरचा जागीच मृत्यू झाला  या खुनाची घटना समजताच भागातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती काही वेळातच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे करवीर चे उपविभागीय पोलिस अधिकारी सुजित कुमार शिरसागर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.