चिपरी येथील मेंढपाळाची मुलगी साधना गावडे बनली कालवा निरीक्षक(इन्स्पेक्टर).
चिपरी येथील मेंढपाळाची मुलगी साधना गावडे बनली कालवा निरीक्षक(इन्स्पेक्टर).
-----------------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------------
शिरोळ तालुक्यातील चिपरी येथील मेंढपाळ कुटुंबातील साधना गावडे हिची महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षातुन कालवा निरिक्षक पदी निवड झाली. तिचे वडील मारुती गावडे हे मेंढपाळ आहेत व आई वैशाली गावडे या गृहिणी,बहिण सायली गावडे व श्रेया गावडे या दोन्हीही उच्चशिक्षित आहेत.घरची परिस्थितीही बेताचीच,आयुष्यभर शेळ्या मेंढ्यांच्या पाठीमागे रानोवणी भटकंती करण्यात वडिलांची हयात गेली, पण आपली मुलं शिकली पाहिजेत व मोठ्या हुद्यावर गेली पाहिजेत ही जिद्द ते मनाशी बाळगून होते. गेली चार-पाच वर्षे साधना वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून प्रयत्न करत होती , पण यश थोडक्यात हुलकावणी देत होते. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर तिने यशाला गवसणी घातली व एका मेंढपाळाची मुलगी अधिकारी झाली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिपरी याठिकाणी तर उच्च माध्यमिक शिक्षण जयसिंगपुर याठिकाणी पूर्ण केले.मेंढपाळाची मुलगी ओपन मधून मेरिट वर आल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती, घरची शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नाही, पण साधनाने प्रयत्न करणे सोडले नाही . जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळवण्याचा प्रयत्न केला शेवटी यश देखील प्रयत्न करणाऱ्याची वाट पाहत असते याच उक्तीप्रमाणे तिला यश मिळाले. तिने मिळवलेल्या यशामध्ये कुटुंबाचा खूप मोठा वाटा असून, त्यांनी दिलेले पाठबळामुळेच हे यश मिळाले असल्याची भावना साधना गावडे यांनी व्यक्त केली. यावेळी दानोळी येथील जयदीप थोरात, विष्णुदास मस्कर, धनंजय यादव, सुहास होगले, प्रकाश केकले पत्रकार अभय वाळकुंजे, बंडू कोळेकर यांच्या वतीने साधनाचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment