मिरज मतदार संघामध्ये एक ही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही पालकमंत्री डॉ.सुरेश भाऊ खाडे.
मिरज मतदार संघामध्ये एक ही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही पालकमंत्री डॉ.सुरेश भाऊ खाडे.
---------------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------------------------
ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या समाचार घेत जलजीवन मिशन व जीवन प्राधिकरण योजनेचा घेतला आढावा ,35 गावांसाठी तब्बल 5 तास बैठक.
मिरज तालुक्यातील सर्व गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जल जीवन मिशन योजने अंतर्गत स्वच्छ, मुबलक पाणी मिळावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी, ठेकेदार यांच्यासहित विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ अशी संयुक्त बैठक बोलावून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.
तालुक्यातील गावांमध्ये योजनेची कामे सुरू असताना येणाऱ्या अडचणी, होणारे वाद अन नागरिकांचा प्रतिसाद याचा सर्वांसमोर लेखाजोखा मांडला गेला. ग्रामस्थांच्या अडचणींचे ऐकल्यावर बऱ्याच ठेकेदारांच्या कामचुकारपणा व कामातील विलंब दिसून आल्याने पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी व ठेकेदारांना धारेवर धरत कामाबाबत जाब विचारला दिलेली कामे वेळेत पूर्ण करा. असे म्हणत मंत्री खाडे यांनी कामाच्या कालावधीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत अल्टीमेट देत ठेकेदारांना सज्जड दम दिला. कामात हलायची पणा केला किंवा कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय झाला. दिलेल्या वेळेत कामं न केल्याने बऱ्याच ठेकेदारांची पाचावर धारण बसली होती.
पालकमंत्र्यांना प्रश्नांना कसे तोंड द्यायचे या तणावात तब्बल पाच तास सर्वजण दिसून येत होते. मिरज मतदार संघातील बेडग, आरग, एरंडोली, बेळंकी, खंडेराजुरी, सुभाष नगर, नरवाड, मानमोडी, खटाव, कांचनपूर, आदी गावांत ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासते. पाण्यासाठी होणारी वनवण थांबावी, यासाठी मंत्री खाडे यांनी जनतेच्या बाजूने पुढाकार घेत प्रशासन व ठेकेदार यांना जाब विचारला. शिवाय गावाला वेठीस धरून राजकारण करू नका असा दम ही दिला. या कामांमध्ये वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या सहकार्यास विलंब होताना दिसून आल्याने पालकमंत्री सुरेश खाडे चांगलेच आक्रमक झाले. मिरज शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10:00 वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. आपल्या मतदारसंघातील सामाजिक जाण, नागरिकांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना करताना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेंची जनतेबाबत तळमळ दिसून आले. जलजीवन मिशनची कामे करताना रस्ता उतरला असेल तर तातडीने रस्त्यांचे मुरमीकरण, खडीकरण, डांबरीकरण, व कॉंक्रिटीकरण, पेविंग ब्लॉकची कामं घेण्याचे आदेश देण्यात आले.
नागरिकांची कोणतीच गैरसोय होता कामा नये यासाठी पालकमंत्री म्हणून मी काळजी घेतोय. लाईट बिल थकीत असेल तर कोणाचे कनेक्शन तोडू नका, माझ्या मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहता कामा नये यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन ही बैठक बोलवली होती. लवकरच संपूर्ण जिल्ह्याची बैठक लावून त्यांचा आढावा घेतला जाईल, असे पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले ,यावेळेस महाराष्ट्र जीवन प्रधिकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी, जलजीवन मिशनचे जिल्हाप्रमुख संजय येवले यांच्यासह अधिकारी कर्मचारी, युवा नेते सुशांत दादा खडे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
.
Comments
Post a Comment